Desi Jugaad: रस्त्यावर धावली बिन घोड्यांची बग्गी, देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा शेअर केला व्हिडिओ
Buggy | (Photo Credit: Twitter/Anand Mahindra)

आजवर घोडे असलेली बग्गी (Horse and Buggy) रस्त्यावर धावताना तुम्ही पाहिली असेल. नव्हे.. नव्हे.. घोडे असतात म्हणून तर ती बग्गी असते. पण, जर बग्गीला घोडेच नसतील तर? तर उत्तर सहाजिक आहे बग्गी जागेवरच उभा राहिली. पण, नाही.. घोडे नसलेली एक बग्गी चक्क रस्त्यांवर धावते आहे. होय, या बग्गीचीच जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या सोशल मीडिया ( Social Media) अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. देसी जुगाड (Desi Jugaad) असलेला हा व्हिडिओ पाहून युजर्सनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत त्यांनी 1972 मधील क्लासिक फिल्म ‘विक्टोरिया नंबर- 203' चा सीक्वल साठी ‘विक्टोरिया ई-203' असे नावही दिले आहे. दरम्यान, या वेळी त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ घोड्याविना धावणाऱ्या एका बग्गीचा आहे. आपणही हा व्हिडिओ पाहिल्यास आपणासही आश्चर्य वाटू शकते. रस्त्यांवर बग्गी तर धावत आहे. परंतू, त्याला पुढे घोडेच नाहीत. संपूर्ण व्हिडिो पाहिल्यावर आपल्या लक्षात येऊ शकेल की हे एक देसी जुगाड आहे. ही बग्गी घोड्यावरची नव्हे तर बॅटरीवर चालणारी आहे. (हेही वाचा, Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class )

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओचे अनेकांनी कौतुक केले आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जुना चित्रपट Victoria No.203 चा पुढचा सीक्वल Victoria e-203 असेल.' आतापर्यंत जवळपास 60 हजारांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.