Boat Capsizes off Syrian Coast : सीरीयाच्या समुद्र किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाली, 34 जणांचा मृत्यू, 14 जण बचावले

सीरियाच्या किनारपट्टीवर प्रवास करत असलेली बोट बुडाल्याने जवळपास 34 स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. बोटीवरील 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बोटीतून वाचलेल्यांवर टार्टौस येथील बासेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, बोट लेबनॉनच्या उत्तर मिन्येह भागातून मंगळवारी रवाना झाली असून त्यात 120 ते 150 लोक होते.