PM Narendra Modi यांच्या योगाची 'दुर्मिळ क्लिप' म्हणून BJP नेत्याने शेअर केला BKS Iyengar यांचा जुना व्हिडिओ; Fact Check मधून समोर आले सत्य
Old video of BKS Iyengar going viral as Narendra Modi doing yoga (Photo Credits: YouTube)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नेहमीच योगाचे (Yoga) मोठे समर्थक राहिले आहेत. संपूर्ण देशाने त्यांना बर्‍याचदा योगा करताना पाहिले आहे. पीएम मोदी स्वतः योग करता करता नेहमीच इतरांनाही योगासाठी प्रेरित करत असलेले दिसून आले आहेत. आता पीएम मोदी यांच्या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की व्हिडिओमध्ये पंतप्रधान योगाची कठीण आसने करीत आहेत. हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज गोयल यांनी शेअर केला आहे. परंतु नंतर जेव्हा या व्हिडिओची तपासणी केली गेली तेव्हा हा दावा खोटा ठरला.

भाजप नेत्याने एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी गोयल यांनी लिहिले आहे, ‘पंतप्रधान मोदी योग करतानाचा दुर्मिळ व्हिडिओ.' हा व्हिडिओ अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाला. नंतर, या व्हिडिओबाबतच्या तपासणीत असे दिसून आले की, व्हिडिओमध्ये दिसत असलेले योगी पीएम मोदी नसून बीकेएस अय्यंगार (BKS Iyengar) आहेत. हा व्हिडिओ 1938 मध्ये चित्रित करण्यात आला होता आणि 2006 मध्ये तो यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. पीएम मोदी यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता. यूट्यूबवर सापडलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ 1938 मध्ये मॅकपॅट्रक यांनी बनवला होता. अय्यंगार या व्हिडिओमध्ये योगाची कठीण आसने करताना दिसत आहेत. (हेही वाचा: प्रभाकर रेड्डी ने एका मिनिटांत डोक्याने उघडली 68 बाटल्यांची झाकणं; अनोख्या पराक्रमाची Guinness Book मध्ये नोंद)

अय्यंगार यांना 'अयंगार शैली' योगाचा संस्थापक मानले जाते. जगातील सर्वात मोठ्या योग शिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. अय्यंगार यांनी तिरुमलाई कृष्णामाचार्यांकडून योगाचे धडे घेतले होते. कृष्णामाचार्य हे आधुनिक योगाचे जनक देखील मानले जातात. ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये त्यांच्या योगाच्या पद्धतीचे वर्णन हात योगाच्या एका प्रकारच्या रुपात सांगितले आहे. व्हिडिओमध्ये अय्यंगार यांचे गुरु कृष्णामाचार्य देखील आहेत, परंतु व्हिडिओचा तो भाग काढून टाकण्यात आला आहे.