Bengaluru Auto Driver Flashes Watch To Take UPI Payments: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी बेंगळुरू (Bengaluru) मधील एका ऑटो चालकाचा व्हायरल फोटो (Auto Driver Viral Photo) शेअर केला आहे. ऑटो चालकाने ग्राहकांकडून यूपीआय पेमेंट (UPI Payment) स्विकारण्यासाठी अनोखा मार्ग शोधला आहे. फोटोमध्ये, ड्रायव्हरने UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅनर असलेले स्मार्टवॉच (Smartwatch) घातले आहे. या ऑटो चालकाने सर्वांचेचं लक्ष वेधून घेतले आहे. अश्विनी वैष्णव यांनी या ऑटो चालकाचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 'स्वॅग ऑफ यूपीआय. पेमेंट करणे खूपचं सोपे झाले आहे.'
ऑटोरिक्षा चालकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल -
ऑटोरिक्षा चालकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून ऑटो चालकाचे कौतुक करत आहेत. यातील एका युजरने ऑटो ड्रायव्हरचे कौतुक करताना टिप्पणी केली आहे की, 'ऑटो अण्णा हे बेंगळुरूमधील सर्वोत्तम पाऊल आहे.' तसेच अनेक वापरकर्त्यांनी बेंगळुरू तंत्रज्ञान-जाणकार जीवनशैलीमध्ये ट्रेंड कसे सेट करत आहे यावर टिप्पणी केली आहे. यातील एका यूजरने म्हटले की, 'हे नवीन भारताचे चित्र आहे.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'ही डिजिटल इंडियाची जादू आहे.' (हेही वाचा - What is UPI Circle: डिजिटल पेमेंट होणार सुलभ, NPCI कडून 'यूपीआय सर्कल' लॉन्च; कसा करावा वापर? घ्या जाणून)
अश्विनी वैष्णव यांची एक्स पोस्ट -
UPI का swag🤘
Payments made super easy. pic.twitter.com/eBc1Fg3hOr
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 21, 2024
2016 मध्ये लाँच झाले UPI -
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे 2016 मध्ये लाँच केलेल्या, UPI ने बँकांमधील त्वरित हस्तांतरणाची सुविधा देऊन पेमेंटमध्ये क्रांती केली आहे. UPI मुळे दैनंदिन व्यवहारात ऑनलाईन पेमेंट करणे खूपचं सोपे झाले आहे.