Image For Representation (Photo Credit : pixabay)

विचार करा! जर का रोज डोळे उघडताच तुमच्या घराच्या दारावर तुम्हाला एक पिझ्झा मिळू लागला तर, एक दिवस नाही, आठवडा नाही, महिना नाही, वर्ष नाही तर चक्क 9 वर्ष सलग हाच प्रकार न चुकता विना एकही दिवसाचा खंड पडता सुरू राहिला तर.. काही जणांना अर्थात हे एखाद्या हव्याहव्याशा स्वप्नासारखे वाटेल मात्र जेव्हा ही परिस्थिती खरोखरच सत्यात उतरते तेव्हा काय होते हा प्रकार बेल्जीयम मधील एक व्यक्ती अनुभवत आहे. मागील 9 वर्षांपासून बेल्जीयमच्या (Belgium)  टर्नहाऊट (Turnhout) शहरात राहणाऱ्या या व्यक्तीला रोज विना ऑर्डर करता विना बिल भरता एक पिझ्झा डिलिव्हरी (Pizza Delivery)  मिळत आहे. हे एक रहस्य आहे यामागे नेमकं कोण आहे आणि असं का करतंय याबद्दल या व्यक्तीला सुद्धा काही कल्पना नाही. अलीकडेच हा प्रकार त्याने माध्यमांसोबत शेअर केला होता. आता फ्री पिझ्झा ऐकून हा नेमका प्रकार काय आहे याची तुम्हालाही उत्सुकता असेल हो ना? चला तर मग जाणून घेऊयात... कर्करोगाशी झुंज देत असलेल्या व्यक्तीसाठी रेस्टॉरंटने तब्बल 800 किमी.अंतरावर पोहचवला पिझ्झा

बेल्जीयन च्या टर्नहाऊट भागात राहणार जीन व्हॅन लॅंडेगेम या 65 वर्षीय व्यक्तीच्या बाबत हा प्रकार घडत आहे. 9 वर्षांपूर्वी या व्यक्तीला त्याने कधीही ऑर्डर केली नव्हती अशी पिझ्झाची डिलिव्हरी मिळाली, अर्थात एखाद्या पिझ्झा लव्हार प्रमाणे हा व्यक्तीही खुश झाला त्याने ती डिलिव्हरी स्वीकारली मात्र हा प्रकार नंतर रोजच घडू लागला. जीनच नव्हे तर त्याच भागात राहणारा त्याचा मित्रही जवळजवळ एक दशकापासून असाच अनुभव घेत आहे. जीन ने दिलेल्या माहितीनुसार, पिझ्झाच्या डिलीव्हरीमुळे तो इतका छळत आहे की आता प्रत्येक वेळी जेव्हा तो घराबाहेर स्कूटरचा आवाज ऐकतो तेव्हा तो भीतीने थरथर कापतो.  ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीवरी बॉय, होऊ शकते 18 वर्षे कारागृहाची शिक्षा, तुर्की येथील घटना

गेल्या वर्षी घडलेल्या एका घटनेत तर एकाच दिवशी त्याला 10 वेगळ्या डिलिव्हरी बॉईज कडून प्रत्येकी 14 पिझ्झाा डिलिव्हर करण्यात आले. तेव्हा पासून जीनच्या समोर कोणी पिझ्झा म्हंटले तरी त्याला भीती वाटू लागते. वास्तविक सुरुवातीच्या काही वेळा जीनला पत्ता चुकीचा असेल असे वाटले म्ह्णून त्याने या पिझ्झा डिलिव्हरी नाकारल्या होत्या, परंतु वारंवार असेच घडत असल्याने हॉटेलच्या डिलिव्हरी बॉईज सोबत वाद होऊ लागले. यामध्ये हॉटेलची काही चूक नसल्याने सर्वांचा त्रास वाचवण्यासाठी जीन ने रोज या डिलिव्हरीज स्वीकारण्याचा पर्याय निवडला. आता तर कधीकधी दिवसातून अनेक वेळा पिझ्झा डिलिव्हरी केला जातो. मुख्यतः पिझ्झा मिळाला असता, इतर फास्ट-फूड वस्तूंचा देखील ऑर्डरमध्ये समावेश असतो.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जीन च्या मित्राला सुद्धा असाच अनुभव आला असल्याने हा एकूण प्रकार त्यांच्या कोण्या ओळखीच्या व्यक्तीकडून केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र यात काय खरं आहे हे मात्र अजूनही रहस्य आहे.