ते जोडपं इंग्लंडमधलं. घटनाही इंग्लंडमधली. काहीशी विचित्र आणि तितकीच आश्चर्यकारक. ४६ वर्षांची क्लेयर बास्बे (हे महिलेचं नाव आहे बरं)आणि ५५ वर्षांचा जॉन मार्शल. दोघांचाही एकमेकांवर भारी जीव. प्रदीर्घ काळांनंतर दोघं एकदा एकमेकांना भेटले. सर्वसाधारण युगुलांमध्ये जे होतं ते त्यांनीही केलं. जसं की, हिंडणं-फिरणं झालं. एखाद्या हॉटेलाट भोजन वैगेरे. मग दोघांचीही स्वारी तिच्या घरी आली. एकमेकांबद्दलच्या प्रेमातून दोघांनी एकमेकांना बाहूपाशात घेतले. दोघांमध्ये प्रणयक्रीडा सुरु झाली. पण, त्यांचा प्रणय यशस्वी व्हावा हे कदाचित नियतीलाच मान्य नसावे. दोघेही प्रणयमग्न अवस्थेत असताना अपघात घडला. अचानकपणे त्यांचा बेडच तुटला. क्लेयर यांना गंभीर दुखापत झाली.
क्लेयर बास्बे या विवाहीत आहेत. त्यांनाच ४ मुलेही आहेत. अपघात घडल्यामुळे त्यांना प्रचंड दुखापत झाली. सध्या त्या व्हिलचेअरवरच असतात. घडलेल्या अपघाताबद्दल बास्बे यांनी बेड बनवणाऱ्या कंपनीला दोषी धरलं आहे. त्यांनी कंपनीची तक्रार न्यायालयात केली आहे. बास्बे यांच्या बहिणिनेही दावा केला आहे की, कंपनीने सदोष बेड बास्बे यांना विकला होता. त्यामुळे या प्रकरणात कंपनीच दोषी असल्याचे बास्बेंच्या बहिणीचे म्हणणे. (हेही वाचा,भाजप नेते बिनविरोध जिंकले पण, हत्तीवरुन पडले; विधानसभा उपाध्यक्षपदी झाली होती निवड)
दरम्यान, बेड तयार करणाऱ्या संबंधीत कंपनीनेही आपली बाजू मांडली आहे. क्लेयर बास्बे आणि त्यांच्या बहिणिने केलेला दावा चुकीचा आहे. त्यात काहीही तथ्य नाही. आम्ही बेड सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याची खात्री करुनच क्लेयर यांना विकला होता. आम्ही आमच्या उत्पादनाची सुरक्षा आणि मजबूतपणा याची नेहमीच काळजी घेतो, असा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, बास्बे यांनी २०१३मध्ये हा बेड खरेदी केला होता. पण, वापरादरम्यान काही आठवड्यातच तो तुटल्याचा दावा बास्बे यांची बहीण करते. ही घटना पाच वर्षांपूर्वीची असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, अद्यापही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.