व्हिडिओ: भाजप नेते बिनविरोध जिंकले पण, हत्तीवरुन पडले;  विधानसभा उपाध्यक्षपदी झाली होती निवड
भाजप नेते हत्तीवरुन पडले (प्रतिकात्मक आणि संपादित प्रतिमा)

भारतीय जनता पक्षाचे नेते कृपानाथ मल्लाह यांची असम विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. पण, सर्वाधिक चर्चा त्यांच्या निवडीची नाही तर, त्यांच्या हत्तीसोबत झालेल्या अपघाताची आहे. कृपानाथ यांच्या समर्थकांनी त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हत्तीवरुन विजयी मिरवणूक काढली. दरम्यान, या मिरवणुकीवेळीच हा अपघात घडला. समर्थकांच्या बहुसंख्येत कृपानाथ हत्तीवर स्वार झाले. पण, त्यांना हत्तीची सवारी तितकी लाभली नाही. हत्तीवरुन सवार झालेले कृपानाथ काही वेळातच हत्तीवरुन खाली पडले. महत्त्वाचे म्हणजे हत्तीच्या माहूताने प्रसंगावधान दाखवल्याने त्यांना फार दुखापत झाली नाही. पण, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार शनिवारी (६ ऑक्टोबर) घडला आहे.

असम विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक बुधवारी पार पडली. या निवडणुकीत भाजपचे कृपानाथ मल्लाह विजयी झाले. विधानसभा अध्यक्ष हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी कृपानाथ उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. गोस्वामी यांनी सांगितले की, कृपानाथ मल्लाह यांच्या बाजूने ६ नामांकनेक आली होती. त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार नव्हता. त्यामुळे अर्थातच ही निवडणूक बिनविरोध झाली.

कृपानाथ हे विधानसभेचे १४वे उपाध्यक्ष असतील. भाजप नेते दिलीप कुमार पॉल यांनी व्यक्तिगत कारणावरुन आपल्या पदाचा राजीनामा (८मे) होता. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कृपानाथ यांची निवड झाली आहे.

करीमगंज जिल्ह्यातील रताबडी विधानसभा मतदारसंघातून कृपानाथ विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.