Tigress Vs Bear On Camera Fight: वाघीण आणि अस्वल आमनेसामने, पुढे काय घडले? (Watch Rare Video)
Tigress Vs Bear | Photo Credits: X)

Tigress Bear Confrontation Rare Video: अन्नसाखळी आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. त्यातही शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सुरु होतो एक भक्ष आणि भक्षक (Rarest Of The Rare Tigress Bear Confrontation) यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष. पण आमनेसामने आलेले दोन्ही प्राणी जर मांसाहारी असतील तर? दोघांमध्ये नेमके कोण जिंकेल? अशा प्रश्नांचे उत्तर देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहयला मिळते की, वाघीण आणि अस्वल यांच्यातील सामना. दोन्ही प्राणी आमनेसामने येतात. नेमके काय घडते त्यांच्यात? जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओ नक्कीच पाहू शकता.

निसर्गाची अगाध लीला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने नेटीझन्सना चांगलेच प्रभावीत केले आहे. पण ही घटना पाहणारे प्रेक्षकही चांगलेच आश्चर्यचकीत झाले आहेत. निसर्गाची अगाध लीला पाहून नेटीझन्सहीने वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांनी हा व्हिडिओ एक्स हँडलवर सामायिक केला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, एक भव्य वाघीण आणि अस्वल आमनेनसामने येते. दोन्ही प्राण्यांमध्ये होणारी चकमक पर्यटक आपली जिप्सी दूर उभी करुन पाहातात. (हेही वाचा, Bear vs Tiger Viral Video: अस्वल आणि वाघ यांच्यात जोरदार लढाई, कोण जिंकले? (पाहा व्हिडिओ))

तुल्यबळ शक्तींनी टाळला संघर्ष

पर्यटकांसमोर अचानक घडलेल्या प्रसंगात पाहायला मिळते की, झुडुपातून एक अस्वल बाहेर पडते आणि वाघिणीच्या समोरून रस्ता ओलांडते. अनपेक्षित चकमक होऊनही, वाघीण संयम राखते, अस्वलाच्या हालचालींचे लक्षपूर्वक निरीक्षण करते. अस्वल विरुद्ध बाजूने आपला प्रवास सुरू ठेवत असताना वाघीण कानोसा घेते. पण दोन्ही प्राणी दोन्ही बाजूंनी संयम पाळतात. त्यामुळे एक सूप्त आणि संभाव्य संघर्ष टाळतो. अत्यंत हिंस्त्र असलेल्या पण तुल्यबळ असलेल्या शक्तीशी संघर्ष टाळणे हे जणू त्यांना निसर्गानेच शिकवलेले असावे कदाचित. अत्यंत रोमांचक असा हा व्हिडिओ नेटीझन्सना प्रचंड आवडला आहे. (हेही वाचा, Bull Jumps Viral Video: वळूची हवेत उडी, अनकांनी म्हटले व्वा! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

व्हिडिओ

निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांनी व्हिडिओ शेअर करताना एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, हा प्रसंग पिलभीत येथील व्याग्र प्रकल्पात घडला. दरम्यान, हा व्हिडिओ ऑनलाईन सामायिक झाल्यापासून तो 8,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. जो पाहून नेटीझन्सनी अनेक टिपण्ण्या केल्या आहेत.व्हिडिओवर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने म्हटले की, "हे आश्चर्यकारक आहे की दोघेही एकमेकांना न भांडता किंवा हानी न करता समोरासमोर येतात आणि शांततेने त्यांच्या मार्गाने जातात." दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, "आश्चर्यकारक निसर्ग," एका वापरकर्त्याने तर या प्रसंगाची तुलना चक्क "द जंगल बुक" मधील पात्रांसोबत करत वाघीण आणि अस्वल यांना "बघीरा आणि शेरखान समोरासमोर!" असे म्हणत संबोधले आहे.