Monkey With Tiger | (Photo Credit - instagram)

दैनंदिन कामे करुन तुम्ही जर काहीसा कंटाळला असाल तर तुम्ही इथे स्क्रोल करु शकता. स्क्रोल करण्याने तुम्हाला येथे एक व्हिडिओ (Cute Animal Video) पाहायला मिळेल. हा व्हिडिओ कधाचीत तुमचा थकवा दूर करुन चेहऱ्यावर स्मीतहास्य फुलवायला मदत करु शकेल. होय, हा व्हिडिओ आहेच तसा. हा व्हिडिओ (Baby Monkey Plays With Tiger Cub Video) आहे एका माकडाच्या पिल्लाचा आणि वाघाच्या बछड्याचा. अर्थात, माकड आणि वाघ यांची दोस्ती पाहायला मिळणे तसे फारच कठीण. पण बालपणात सगळं काही माफ असतं. असंच काहीसं या दोन गोंडस पिल्लांमध्ये पाहायला मिळू शकेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @tigers_videos नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्याला आतापर्यंत 2,300 लाईक्स मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये माकड आणि वाघाचा बछडा यांच्यातील दुर्मिळ संवाद पाहायला मिळत आहे. बछडा आणि माकड एकमेकांना मिठी मारताना आणि खेळताना दिसते. (हेही वाचा, Monkey Ride On Cat's Back Video: मांजराच्या पाठीवर माकड स्वार, निसर्गाच्या दुनीयेतील अनोखी सफर; पाहा व्हायरल व्हिडिओ)

माकड आणि बछडा यांच्यातील प्रेम पाहून नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर्स म्हणतो की, दोन्ही बाळं फार छान खेळत आहेत. दुसरा युजर्स माकडाच्या पिल्लाला उद्देशून म्हणतो, 'थांब बछड्याला जरा मोठा होऊ दे.. मग खेळ त्याच्यासोबत.' सोशल मीडियावर, 17 नोव्हेंबर रोजी शेअर केल्यापासून या व्हिडिओला 25,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी हार्ट आणि लव्ह-स्ट्रक इमोजींचा वापर करत नेटीझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Tigers Videos (@tigers_videos)

सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ असतात जे व्हायरल होतात. किंबहुना ते व्हिडिओ असे असतात म्हणूनच व्हायरल होतात. प्राण्यांबाबतच्या व्हिडिओंना खास करुन अनेकदा प्रसिद्धी मिळते. अनेकांना वाटते प्राण्यांचे त्यांच्या पिल्लांचे व्हिडिओ प्रेरणादायी आणि भलतेच मनोरंजक असतात. असे व्हिडिओ लोक सोशल मीडियावर स्वत: पोस्ट करतात, शेअर करतात आणि त्याखाली लाईक करुन प्रतिक्रियाही देतात.