Auto Rickshaw Driver Saves Woman: रिक्षाचालकाने वाचवले ट्रेनखाली आत्महत्या करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचे प्राण (Watch Video)
Auto Rickshaw Driver Saves Woman | (Photo Credits: Twitter)

मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh एका ऑटो रिक्षा (Auto Rickshaw) चालकाच्या प्रसंगावधानामुळे एका उच्चशिक्षीत तरुणीचे प्राण वाचले (Auto Rickshaw Driver Saves Woman) आहेत. ही तरुणी एमबीए (MBA) चे शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात होती. उच्चशिक्षण घेऊनही हवी तशी नोकरी मिळत नसल्याने पाठिमागील काही दिवसांपासून ती नैराश्येत होती. दरम्यान, ती बैतूल येथील रेल्वे फाटक जवळ आली. ट्रेन येणार असल्याने फाटक बंद करण्यात आले होते. दरम्यान, ही तरुणी फाटकाचा खांब ओलांडून पुढे गेली. आत्महत्या करण्याचा तिचा इरादा ऑटोचालक मोहसिन याच्या ध्यानात आला. त्यामुळे तो हळूहळू तरुणीच्या पाठी गेला. समोरुन ट्रेन येताच ही तरुणी ट्रेनखाली झेप घेणार इतक्यात झेप घेऊन त्याने तिला पकडले आणि मागे खेचले. काही क्षणांचा जरी विलंब झाला असता तरी तरुणीचे प्राण गेले असते. दरम्यान, या प्रकरणात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्रकार Ravish Pal Singh यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही रिट्विट केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना उत्तर प्रदेशातील बैदूल येथील सोनाघाटी परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वेफाटक येथे सोमवारी (20 सप्टेंबर) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी इटारसी च्या दिशेने जाणारी संघमित्रा एक्सप्रेस फाटक ओलांडते. ट्रेन येण येण्याच्या वेळी हे फाटक नेहमीच बंद केले जाते. ही घटना घडली तेव्हाही हे फाटक बंद होते. मात्र ही तरुणी फाटक ओलांडून थेट रेल्वे ट्रॅकच्या दिशेने धावली. मात्र ऑकोरिक्षा चालकाने तिचे प्राण वाचवले. (हेही वाचा, Video : आत्महत्या करणाऱ्या आईचे मुलीने असे वाचवले प्राण)

ऑटोरिक्षा चालक मोहसिन याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तो आपल्या ऑटोतून प्रवाशांना घेऊन सोनाघाटी च्या दिशेने निघाला होता. मात्र फाटक पडल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे मोहसीनप्रमाणे इतरही प्रवासी फाटक उघडण्याची वाट पाहात होती. या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या ओढणीने चेहरा झाकलेली एक युवतीही थांबली होती. मात्र, ट्रेन आल्याचा आवाज येताच ही तरुणी ट्रॅकच्या दिशेने धावली. मला सुरुवातीपासूनच तिची हालचाल काहीशी संशयास्पद होती. त्यामुळे मी सावध होतो. ती ट्रॅकच्या दिशेने धावताच मी पाठिमागून धावलो आणि तिला मिठी मारुन पाठीमागे खेचले.

ट्विट

तिला पाठिमागे खेचल्यावर तिला उपस्थित नागरिकांनी समजावले. परंतू, ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. ती मोठ्याने ओरडत आणि रडत होती. उपस्थित नागरिकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर तिने कुटुंबाविषयी माहिती दिली. पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क करुन त्यांना बोलावून घेतले व तिला कुटुंबयांच्या हवाली केले.