आईचे प्रेम आणि माया याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होवू शकत नाही. आपल्या बाळाला त्रासात पाहून कोणत्याही आईची रात्रीची झोप उडून जाईल. प्रत्येक आई नेहमी आपल्या बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करत असते. परंतु, कोणती आई आपल्याला शांत झोप लागावी म्हणून आजारी आईचे आयुष्य धोक्यात टाकेल? मात्र असे घडले आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) मधून एक घटना समोर आली आहे. एका आईने चांगली झोप यावी म्हणून आजारी मुलाचा (Ill Baby) जीव धोक्यात टाकला. बाळाच्या आजारपणाला कंटाळलेल्या आईने फिडींग ट्युबमध्ये (Feeding Tube) ब्लीच टाकून मुलाला दिले.
द सन ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय आरोपी महिलेचे नाव ब्रुक एवलिन लुकास (Brooke Evelyn Lucas)असे आहे. या महिलेने फिडींग ट्युबमध्ये ब्लीच टाकून आपल्या मुलाला दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. ब्लीचमुळे आजारी बाळाची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर महिलेने याचा आरोप आपल्या मुलीवर लावला. नंतर मात्र तिने आपला गुन्हा कबुल केला. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून त्या बाळाचे प्राण वाचले आहेत. (America: 10 वर्षात 'तिने' दिला 10 बाळांना जन्म; 36 वर्षीय महिला पुन्हा प्रेग्नेंट)
प्राप्त माहितीनुसार, या बाळाचा जन्म डिलिव्हरी डेटच्या एक दिवस आधीच झाला होता. त्यामुळे तो खूप अशक्त होता. त्यामुळे त्याला खाऊ घालण्यासाठी फिडिंग ट्युबची मदत करावी लागत होती. मुलगा आजारी असल्याने महिलेला त्याच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे तिला शांत झोपही मिळत नव्हती. मात्र त्यामुळे ती चिडली आणि बाळाच्या फिडिंग ट्युबमध्ये डिटर्जेंट लिक्विड मिसळून त्याला दिले. बाळाची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पोलिस चौकशीत तिने आपल्या चार वर्षांच्या मुलीला दोषी ठरवले. परंतु, बाळाला 4 महिने रुग्णालयात ठेवल्यानंतर महिलेला केलेल्या कर्माचा पश्चात्ताप झाला आणि तिने पोलिसांना सर्व सत्य सांगितले.