बाळाचा जन्म हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत सुखद क्षण असतो. बाळाच्या जन्माने स्त्री ला आई होण्याचे सुख प्राप्त होते. परंतु, आई होणे तितकेसे सोपे नसते. बाळाला जन्म म्हणजे स्त्रीचा पुर्नजन्मच असतो, असे मानले जाते. 9 महिने बाळाला उदरात सांभाळणे, गरोदरपणात होणारे शारीरिक-मानसिक बदल अनुभवणे, प्रसुती कळा सोसणे अवघड असते. असह्य अशा प्रसुती वेदना सहन केल्यानंतर जन्माला आलेले बाळ प्रत्येक आईला होणारा आनंद अतुलनीय असतो. विशेष म्हणजे होणाऱ्या त्रासाची कल्पना असूनही बाळाला जन्म देण्याची आणि आई होण्याची इच्छा प्रत्येक मुलीच्या मनी असते. परंतु, एक-दोन मुलं होणं हे आजकालच्या जगात अगदी स्वाभाविक आहे. परंतु, 10 मुलं!!! हो. अमेरिकेतील एका 36 वर्षीय महिलेने 10 वर्षात तब्बल 10 मुलांना जन्म दिला आहे. मात्र अजून दोन मुलं तिला हवी आहेत. आता ती अकराव्यांदा गरोदर आहे. कर्टनी रोजर्स (Courtney Rogers) असे या महिलेचे नाव आहे.
2008 मध्ये कर्टनी रोजर्स हिचे क्रिस रोजर्स याच्याशी लग्न झाले. 2010 मध्ये त्यांच्या आयुष्यात पहिल्या बाळाचे आगमन झाले. त्यानंतर ती 9 वेळा गरोदर राहिली आहे. मागील 10 वर्षात केवळ 9 महिन्यांचा काळ तिने प्रेग्नेंसीशिवाय घालवला आहे. 10 पैकी 6 मुलगे आणि 4 मुली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक मुलाचे नाव सी वरुन ठेवले आहे. क्लिंट, क्ले, केड, कॅली, कॅश, जुळी कोल्ट आणि केस, कॅलेना, केड्यू आणि कोरले अशी या मुलांची नावे आहेत. (डच येथील स्त्रीरोगतज्ज्ञाने पालकांना न सांगता स्वतःहा च्या Sperm चा वापर करत दिला १७ बालकांना जन्म)
याबद्दल बोलताना कर्टनी यांनी सांगितले की, माझे यापूर्वी माझा दुसऱ्या तिमाहीत गर्भपात झाला होता. त्यामुळे माझ्या मनात काहीशी भीती होती. परंतु, आता माझा 33 वा आठवडा सुरु आहे आणि मी खूप आनंदात आहे. आम्ही या बाळाला जगात आणण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही. तसंच 10 मुलांच्या पालनपोषणामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तरी देखील आम्हाला अजून दोन मुलं हवी आहेत, असेही कर्टनी यांनी सांगितले.