Kaylen Ward ने Nude Photo पोस्ट करत ऑस्ट्रेलिया वणव्याच्या नुकसान भरपाईसाठी केले देणगीदारांना आवाहन; अजब प्लॅन ऐकुन व्हाल थक्क
Instagram Model, Kaylen Ward (Photo Credits: @lilearthangelk/ Twitter)

Australia Bushfire: ऑस्ट्रेलिया (Australia) मधील वणव्यामुळे जगभरात निसर्ग हानी आणि आर्थिक नुकसानाच्या चर्चा पेटल्या आहेत. न्यू साऊथ वेल्स (New South Vales)  मध्ये या आगीमुळे आतापर्यंत तब्बल 50 कोटी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही आग पूर्णतः न संपल्याने येत्या दिवसात परिस्थिती बिघडण्याची शक्यता टाळता येत नाही. या आगीमुळे प्रभावित घटकांना शक्य त्या पद्धतीने मदत करता यावी यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. असाच काहीसा प्रयत्न 20 वर्षीय इंस्टग्राम मॉडेल आणि ऑनलाईन सेक्स वर्कर केलेन वार्ड (Kaylen Ward) हिने देखील केला आहे, मात्र यासाठी तिने वापरलेली पद्धत मात्र अगदी न ऐकलेली आणि अजब आहे. केलेन हिने आपल्या इंस्टाग्राम तसेच ट्विटर अकाऊंटवरून आपल्या फॅन्स आणि फॉलोवर्सना ऑस्ट्रेलियाच्या आगीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे, असे केल्यास ती आपल्या फॅन्सना आपले न्यूड फोटो (Nude Photo) पाठवणार असल्याचे देखील म्हंटले आहे, या न्यूड फोटोची एक झलक म्ह्णून तिने एक सेल्फी देखील आपल्या पोस्टला जोडली आहे.

केलेन हिच्या या प्लॅनला लोकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे, आतापर्यंत या प्लॅनमधून तब्बल 700,000 डॉलर्सची रक्कम जमा झाली आहे. असं असलं तरीही इंस्टाग्रामने केलेनची पोस्ट आपल्या नियमात बसत नसल्याने डिलीट करत तिचे अकाउंट सुद्धा ब्लॉक केले आहे. वास्तविक न्यूड फोटो विकणे हा केलेन हिचा व्यवसायच आहे मग ट्यूबचा फायदा गरजूंना का व्हायला नको असा विचार करून तिने हा प्लॅन बनवल्याचे सांगितले.

केलेन वार्ड न्यूड सेल्फी पोस्ट

दरम्यान, केलेन हिचे ट्विटर वरील ओळख हि 'द नेकेड फिलैंथ्रोपिस्ट ’ अशी आहे. सध्या हे न्यूड फोटो आणि केलेनचा प्लॅन प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी डोनेशन करत तिचे हे फोटो विकत घेतले आहेत.