Amsterdam Tulip Field (Photo Credits: @zoowaker/ Twitter)

सोशल मीडीयामध्ये नेटकर्‍यांची क्रिएटीव्हीटी हा अनेकदा आपलं मनोरंजन करणारी असते. वायरल होणारे फोटोज, व्हिडिओज खळखळून हसायला लावणारे असतात. कधी ते मजेशीर असतात तर कधी महत्त्वाची माहिती देणारे पण काही ट्रेंडींग ट्वीट्स, पोस्ट मध्ये मात्र उपहासात्मक टीका देखील असते. सध्या सोशल मीडीयामध्ये असेच काही ट्वीट्स झपाट्याने वायरल होत आहेत. ट्वीटर वर एका युजर कडून Amsterdam tulip गार्डन्सचा एक फोटो महाराष्ट्रातील कास पठार म्हणून पो करण्यात आला आहे. मग नेटकर्‍यांनी देखील या चूकीवर बोट ठेवत काही स्थळांना त्यांच्या क्रिएटीव्हीटीची जोड देत हा प्रकार जगातील अनेक स्थळांशी जोडत मजेशीर ट्वीट्स बनवली आहेत.

दरम्यान @zoowaker या ट्वीटर युजर कडून आम्सटरडॅम येथील ट्युलिप गार्डनचा फोटो सातारा मधील कास पठार मधून शेअर करण्यात आला आहे. बघता बघता या ट्वीटवर लाईक्स, शेअर, कोट्स आणि रिट्वीट्स, कमेंड्सचा पाऊस सुरू झाला आहे. कास पठार वर उमलणारी फुलं पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गर्दी करत असतात. कास पठारावर देखील लाल, पिवळी, निळी, जांभळी, गुलाबी फुलं डोळ्यांचं पारणं फेडणारा अनुभव देतात. आज एका फोटोवरून झालेल्या गडबडीतून पहा नेटकर्‍यांची कमाल मजेशीर ट्वीट्स

Amsterdam tulip गार्डन्सला कास पठार म्हणणारं पोस्ट

सोशल मीडीयामध्ये नियमित अनेक मिम्स वायरल होत असतात. सध्या वायरल होणारी वरील पोस्ट, ट्वीट्स देखील मजेशीर आहेत. त्यानंतर अनेकांचे खोचक सल्ले आणि क्रिएटीव्हिटी देखील तुफान आहे.