हिंदी बिग बॉस मध्ये आलेली गुरु-शिष्याची जोडी अनुप जलोटा (Anup Jalota) आणि जसलिन मथारू (Jasleen Matharu) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. जसलिन ने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल अकाउंट नववधूच्या अवतारात एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावरुन अनुप जलोटा आणि जसलिन ने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. या व्हिडिओमध्ये जसलिन 'चुप के लगा जा गले' या गाण्यावर नाचत आहे. यामध्ये तिच्या सेक्सी अदा तिच्या चाहत्यांना खूप भावल्या असल्या तरीही तिच्या हातातील लाल चुडा आणि भांगेमध्ये कुंकू पाहून संभ्रमात पडले आहे. या व्हिडिओमागील सत्य जसलिन ने 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना सांगितले आहे.
TOI ला जसलिन ने दिलेल्या माहितीनुसार, तिचे लग्न झाले नसल्याचे कळते. केवळ हे गाणं ऐकताना तिला लग्नाची फिलिंग आली आणि उत्साहाच्या भरात तिने नववधूचा साज-श्रृंगार करुन या गाण्यावर या मादक अदा दिल्या आहेत.
हेदेखील वाचा- बिग बॉस 12 : ....जेव्हा जसलीन मथारु बिकीनीमध्ये अवतरते !
हा व्हिडिओ तिने घरात शूट केला असून काळ्या रंगाच्या नायटी मध्ये दिसत आहे.
भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलिन मथारू यांची जोडी 'बिग बॉस 12' मध्ये प्रचंड गाजली होती. यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा ही ब-याच रंगल्या होत्या. यावरून सोशल मिडियावर नेटक-यांनी त्यांना ट्रोल केले होते.