Anil Bonde and a Police Officer | (Photo Credits: Twitter/ @DoctorAnilBonde)

भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि अमरावती पोलीस (Amravati Police) अधिकारी यांच्यात अत्यंत असभ्य भाषेत संवाद ( Anil Bonde and a Amravati Police Officer Talk in Vulgar Language) घडला आहे. या संवादाचा व्हिडिओ अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर केला आहे. या व्हिडिओत अनिल बोंडे आणि एक पोलिस अधिकारी एकमेकांचा उल्लेख कुत्रे असा करताना दिसतात. अमरावती येथे हा प्रसंग घडला एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. ते आंदोलन करत असताना अनिल बोंडे हे तिथे आले तेव्हा कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन पोलिसांनी त्यांना हटकेल. यावेळी उभयतांमध्ये हा अर्वाच्च भाषेतील संवाद घडला.

एमपीएसी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर होताच परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक झाले. या विद्यार्थांनी राज्यातील विविध शहरांमध्ये आंदोलने सुरु केली. ही आंदोलने राज्यभर सुरु असल्याचे पुढे आले. विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळताच भाजप नेतेही त्या ठिकाणी तातडीने गेले. या विषयाचे राजकारण सुरु झाले. दरम्यान अमरावती येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजप नेते अनिल बोंडे पोहोचले. या वेळी पोलीस आणि बोंडे यांच्यात खडाजंगी झाली. (हेही वाचा, Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवे गाणे; Women's Day 2021 निमित्त चाहत्यांना नवी भेट (Watch Video))

पोलीस आणि अनिल बोंडे यांच्यातील काही संवाद

अनिल बोंडे- अरे आम्ही तुमच्याकडे मागणी करु लागोल काय? आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत.

पोलीस- तुम्ही आंदोलन केलं, तुमच्या आंदोलनावर आम्हाला नियंत्रण आणावं लागलं.

अनिल बोंडे- एवढ्या पोरा-पोरींना आतमध्ये कोंडलं, तुम्हाला समजत नाही काय? पोलीस सरकारचे कुत्रे झाले.

पोलीस- तुम्ही अशी भाषा वापरु नका. तुम्ही पण कुत्रे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी अनील बोंडे यांना ताब्यात घेतले. तर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन काही काळ सुरुच ठेवले. विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील गाडगेनगर चौक येथे चक्का जाम आंदोलन केले होते. या वेळी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमार करण्यात आला.