लोक सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी, युक्त्या करतात. बरेच लोक परिपूर्णता, वेगळे दिसण्याची इच्छा यामुळे शरीरावर अनेक शस्त्रक्रियादेखील करून घेतात. मात्र कधी कधी हे उपचार आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणत हावी होतात की अनेकदा त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. नुकतेच बल्गेरियातील (Bulgaria) अँड्रिया इवानोव्हा (Andrea Ivanova) या 22 वर्षीय मुलीचे फोटो समोर आले आहेत, ज्यामधील तिचे मोठे ओठ (Big Lips) चर्चेचा विषय बनले आहेत. बार्बी डॉल सारखे बनण्याच्या इच्छेमुळे अँड्रियाने तिच्या ओठांवर 20 वे इंजेक्शन घेतले आहे. ज्यामुळे तिच्या ओठांचा आकार चार पट वाढला आहे.
यानंतर अँड्रियाने ने दावा केला आहे की, तिचे ओठ हे जगातील सर्वात मोठे ओठ (Biggest Lips in World) आहेत. नुकतेच तिने 20 वे ‘Hyaluronic Acid’ लिप इंजेक्शन घेतले व त्यानंतर तिने इंस्टाग्रामवर आपल्या मोठ्या ओठांचे फोटो शेअर केले. मात्र तिच्या या फोटोंना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही जणांना तिचे हे ओठ फार आवडले आहेत व त्यांनी तिचे कौतुकही केले आहे. मात्र काही जणांना तिच्या या कृत्यामागे नक्की काय कारण असावे? असा प्रश्न पडला आहे.
अँड्रियाने गेल्या वर्षी तिच्या ओठांचे परिवर्तन सुरु केले. सध्या अँड्रियाला तिचा नवा लुक अतिशय प्रिय आहे व आपल्या ओठांमुळे ती पहिल्यापेक्षा आनंदी आहे. अँड्रिया सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे 34.6 फॉलोअर्स आहेत, ज्यांना तिचे ओठ परिवर्तन प्रचंड आवडले आहे. अँड्रियाने तिचा हा नवीन लूक साकारण्यासाठी हजारो पौंड खर्च केले आहे. साधारण एका ट्रिटमेंटसाठी तीने £134 मोजले आहेत. (हेही वाचा: पूनम पांडे ने आपल्या बॉयफ्रेंडसोबत हॉट पोज देत सोशल मिडियावर शेअर केला फोटो, एकट्यातच पाहा)
World Cartoonist (व्यंगचित्रकार) Day च्या निमित्ताने Raj Thackeray यांनी शेअर केली व्यंगचित्रे - Watch Video
याबाबत बोलताना ती म्हणाली, ‘दोन दिवसांपूर्वी मी माझे नवीन इंजेक्शन घेतले. डॉक्टरांना वाटते की हे पुरेसे आहे, मात्र मला अजून मोठे ओठ हवे आहेत. माझ्या डॉक्टरांनी सांगितले की, ते अजून इंजेक्शन्स देतील पण मला किमान दोन महिने थांबावे लागेल.’