Boss gives employees USD 50,000 bonus (Photo Credits: Associated Press YouTube)

अमेरिकेमधील एका रियल इस्टेट क्षेत्रामधील कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ख्रिसमस या सणानिमित्त तब्बल 35 लाख रुपयांचा बोनस दिला आहे. तर कंपनीच्या एकूण 198 कर्मचाऱ्यांना वाटला असून जवळजवळ त्यांना 50 हजार डॉलर्स यासाठी खर्च करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या बाल्टीमोर मधील सेंट जॉन प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीने हा बोनस दिला आहे. एका पार्टीच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एवढी मोठी रक्कम मिळाल्याने त्यांच्या प्रथम भुवया उंचावत त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

कंपनीचे अध्यक्ष लॉरेंस मेक्रांट्स यांनी याबाबत असे सांगितले की, गेल्या 14 वर्षाच्या दरम्यान 200 लाख वर्ग फिट मध्ये कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट करण्यात आले. तर अशी कोणतीच कंपनी नाही आहे जी कर्मचाऱ्यांशिवाय यश गाठू शकत नाही. त्यामुळेच गेल्या 14 वर्षात कंपनीने जे यश मिळवले आहे ते याचाच एक मुख्य भाग आहे. याच कारणास्तव कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करुन त्यांना सरप्राईज गिफ्टच्या रुपात बोनस देण्यात आला आहे.(देश कंगाल होण्याच्या मार्गावर असताना इथल्या राजाने, 15 पत्नींसाठी खरेदी केल्या 127 कोटींच्या लक्झरी गाड्या Video)

पार्टीदरम्यान एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, तिला देण्यात आलेला लाल रंगाचा लिफाफा सरप्राइज म्हणून देत तो त्यांच्या कामानुसार आणि त्यांनी कंपनीसाठी दिलेल्या वेळेचे महत्व लक्षात घेता तो दिला असल्याचे सांगण्यात आले. या सरप्राइजमध्ये सर्वात कमी रक्कम म्हणजे 100 डॉलर्स (7 हजार) ठेवण्यात आली. ही रक्कम ज्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच कामावर रुजू झालेल्याना देण्यात आली. बोनसची सर्वात मोठी रक्कम 1.91 करोड रुपये आहे.

तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पार्टीमध्ये अचानक दिलेले सरप्राइज काय आहे हे माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या 14 वर्षांपासून कंपनीत काम करत असल्याने मिळालेला हा बोनस नक्की खरा आहे की एक स्वप्न आहे असे त्यावेळी वाटत असल्याचे महिला कर्मचारी स्टेफनी रिडग्वे यांनी सांगितले आहे.