Aman Ramgarhia Viral MMS Leaked Video: पंजाबमधील लोकप्रिय इंफ्लुएंसर अमन रामगढिया (Aman Ramgarhia) गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक लोकांनी तिचे नाव सर्च केले आहे. याचे कारण म्हणजे एक अश्लील व्हिडिओ. अलीकडेच अमन रामगढियाचा एक एमएमएस व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. याआधी पंजाबमधील कुल्हड पिझ्झा जोडप्याचा एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर अशी ही घटना समोर आली आहे.
वृत्तानुसार, ज्याने अमन रामगढियाचा एमएमएस बनवला त्याच व्यक्तीने व्हिडिओ लीक केला आहे. अहवालानुसार, हा लीक झालेला एमएमएस नोव्हेंबर 2022 चा आहे आणि मुलाने ही क्लिप जाणूनबुजून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या प्रकरणानंतर अमन रामगढियाबद्दल मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. या घटनेने लोकांच्या गोपनीयतेबद्दल, इंफ्लुएंसरच्या जबाबदाऱ्या आणि डिजिटल एक्सपोजरच्या परिणामांबद्दल व्यापक वादविवादाला सुरुवात झाली आहे.
कोण आहे अमन रामगढिया?
अमन रामगढिया हे प्लॅटफॉर्मवर, विशेषत: इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर असलेले एक नाव आहे. रामगढियाचे साधारण 115k फॉलोअर्स आहेत. तिची सर्जनशीलता, मॉडेलिंग कौशल्य आणि दैनंदिन अनुभवाद्वारे विविध प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याच्या क्षमतेबद्दल तिचे कौतुक केले जाते.
अमन रामगढियाची प्रतिक्रिया-
अमन रामगढियाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, व्हिडिओमध्ये तीच आह्रे, आणि तिने हा व्हिडिओ बनवण्याची परवानगी दिली होती. आता व्हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देताना अमन रामगढिया म्हणते, ‘माझ्याबाबत काही दिवसांपासून एक विषय सुरू आहे, पण या विषयावर काहीही बोलण्याचे धाडस माझ्यात नव्हते. पण आता खूप झाले आहे. माझे फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी हे केल्याचे काही लोक म्हणत आहेत. या घटनेनंतर माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय होईल याचा ते विचार करत नाहीत. माझी एकच चूक होती की, मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्याला व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची परवानगी दिली.’ (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: लज्जास्पद! उत्तर प्रदेशमधील बरेली येथे 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, पीडितेचा मृत्यू)
ती पुढे म्हणते, ‘पुढे जाऊन माझ्यासोबत असे काही घडू शकेल, असे मला वाटलेही नव्हते. आता जे व्हायला हवे होते ते झाले. गेल्या अनेक दिवसांपासून मी खूप अस्वस्थ होतो. मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे माझे मित्र आणि कुटुंबीयांना माहीत आहे. व्हायरल होणारी क्लिप नोव्हेंबर 2022 ची आहे. अशा खोट्या मुलांच्या फंदात पडू नये याची मी सर्व मुलींना जाणीव करून देते.’ अमन रामगढियाचा समावेश असलेला व्हायरल एमएमएस व्हिडिओ हा डिजिटल युगाशी संबंधित आव्हाने आणि जोखमींची एक स्पष्ट आठवण करून देतो.