Sunny Baba | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सोशल मीडिया आणि व्हायरस हे गणित आता इतके जुळले आहे की ज्यामुळे अनेकांना यशाची भरारी मारता आली. सोशल मीडियावर कोण, कधी, काय आणि का व्हायरल होईल हे सांगता येत नाही. ढिंच्याक पुजा (Dhinchak Pooja), रानू मंडल (Ranu Mandal), डान्सिंग अंकल (Dancing Uncle) ही मंडळी यशाच्या शिखरावर कशी पोहोचली हे आपण सर्वांनीच पाहिले. याच वाटेवर आता बिहारमधील सनी बाबा नावाचे एक गृहस्थ असल्याचे दिसते. रानू मंडल यांच्याप्रमाणेच बिहारचे हे सनी बाबा (Sunny Baba) नावाचे गृहस्थ भीक मागून आपली गुजराण करतात. मात्र, ही भीक मागण्यासाठी ते गाणी गातात. त्याचे हे गाणेच सोशल मीडियावर अनेकांना भावते आहे. ज्यामुळे त्यांची तुलना रानू मंडल हिच्याशी केली जात आहे.

एका ट्विटर युजरने सनी बाबा यांचा व्हिडिओ ट्विटररवर शेअर केला आहे. ज्यात हे सनी बाबा हिंदीत बोलताना इंग्रजी गाणे गाताना दिसतात. सुरुवातीला हिंदीत बोलणारे हे हिंदी बाबा युजरला इंग्लिशमध्ये बोलण्याची विनंती करतात. त्यानंतर युजरसोबत ते पूर्णपणे इंग्रजीत संवाद साधतात. अत्यंत आत्मविश्वाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपला संवाद कायम ठेवत हे सनी बाबा महोदय इंग्रजी गाणीही गाताना दिसतात.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सनी बाबा यांना आपण काय करता? असे विचारताना दिसतो. यावर सनी बाबा इंग्रजीतच उत्तर देतात. ''I beg'' (मी भीक मागतो.) . हा व्यक्ती पुन्हा त्यांना विचारतो आपण दुपार आणि रात्रीच्या जेवन काय जेवता? यावर पुन्हा ते उत्तर देतात ''What Almighty gave me I am happy with that'' म्हणजे 'परमेश्वर मला जे देतो त्यात मी खूश असतो.' (हेही वाचा, Sherlyn Chopra Video: भोजपुरी गाण्यावर 'अशी' थिरकली शर्लिन चोपडा; Hotness पाहून फॅन्स झाले फिदा!)

ट्विट

सनी बाबा सांगतात की त्यांना नृत्य आणि गायनाचा छंद आहे. व्हिडिओतील व्यक्ती त्यांना एखादे गीत गायला सांगतो. यावर ते एक जुने गाणे गातात. हे गाणे सुप्रसिद्ध गायक Jim Reeves यांचे आहे. 1960 च्या दशकात Jim Reeves हे एक लोकप्रिय गीत, संगीतकार होते. सनी बाबाचे गाणे आणि त्यांचा इंग्लिश बोलण्याचा लहेजा सोशल मीडियावर पसंतीस उतरत आहे.