अभिनेत्री तिस्का चोप्रा हिने शेअर केलेला माकडांच्या पुल पार्टीच्या धम्माल व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
Monekies Pool Party (Photo Credits-Instagram)

सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. या लॉकडाउनमुळे शहरातील रस्ते सामसूम दिसण्यासोबत हवेच्या गुणवत्तेत सुद्धा सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या बाजूला प्राणीपक्षी मुक्तपणे मोकळ्या रस्त्यांवर फिरताना दिसले आहेत. याच पार्श्वभुमीर अभिनेत्री तिस्का चोप्रा (Tisca Chopra) हिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोन माकडे असून त्यातील एका माकडाची पूल पार्टी समोर आली आहे. तिस्का हिने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

तिस्का हिने इन्स्टाग्रामवर माकडांच्या पूल पार्टीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. माकडांच्या पूल पार्टीचा व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणाचा आहे हे अस्पष्ट आहे. परंतु एका इमरातीच्या गॅलरीत बसलेले एक माकड आणि दुसरे खिडकीला लटकून उभे राहिले माकड दिसत आहे. या दोन माकडांपैकी एकजण इमारतीच्या खाली असलेल्या स्विंमिंग पूलमध्ये उडी मारत मस्त पोहताना दिसून येत आहे. तर गॅलरीत बसलेला माकड दुसऱ्या माकडांची पूल पार्टी कशी चालली आहे हे पाहत आहे. तर पाहा माकडांच्या पूल पार्टीचा धम्माल व्हिडिओ:(Fact Check: 10 सेकंद श्वास रोखून धरणाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होत नाही? काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य?)

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे ही डॉल्फिन्स दिसून आले होते. त्याचा व्हिडिओ जूही चावला हिने शेअर केला होता. त्यानंतर बाबूलनाथ येथील गल्ल्यांमध्ये मोरांचा मुक्त वावर आणि मोर नाचतानाचा व्हिडिओ व फोटो सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले होते.