50 वर्षीय आई साठी मुलगी घेतेय नवरदेवाचा शोध ; ट्विटर वर सुरु आहे वरसंशोधन, वाचा सविस्तर
Aastha Varma Tweet (Photo Credits: Twitter)

नवी दिल्ली: लग्नाचं वय झालंय असं म्हणत आपल्या मुलांसाठी स्थळ शोधणारी पालक मंडळी आपण पहिलीच असतील पण अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका ट्विट मध्ये उलटीच गंगा वाहताना दिसत आहे. इथे चक्क एक मुलगी आपल्या 50 वर्षीय आईसाठी वर संशोधन करत असल्याचं समजतंय. ही काही कोण्या सिनेमा किंवा मालिकेची कथा नसून खरोखरच या मुलीने ट्विट करत आपल्या आईसाठी कसा नवरा हवा याची लिस्ट सुद्धा शेअर केली आहे. या मुलीचे नाव आस्था वर्मा (Aastha Varma) असून तिने काही दिवसांपूर्वीच आपल्या आई सोबत फोटो शेअर करत "मला माझ्या 50 वर्षाच्या आईसाठी एक देखणा, शाकाहारी आणि निर्व्यसनी पतीचा शोध आहे" असे कॅप्शन दिले होते. यानंतर काहीच तासात हे ट्विट प्रचंड लोकांपर्यंत पोहचून अनेकांनी आस्थाच्या या विचाराचे कौतुक केले आहे.

आस्थाचे ट्विटर वरील प्रोफाइल पाहता ती कायद्याचे शिक्षण घेत असून आपल्या आई सोबत राहते असे दिसून येते. तिच्या या ट्विटला आतापर्यंत 20  हजारहून अधिक लाईक्स, साडे पाच हजार रिट्विट आणि साडे तीन हजार रिप्लाय आले आहेत.

प्रेमासाठी काय पण! प्रेयसीच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या मृतदेहाशी केले लग्न; कारण वाचून व्हाल थक्क

आस्था वर्मा ट्विट

आस्थाच्या या ट्विटचे लोकांनी कौतुक करत तिला या शोधासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांनी तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, जसे की एकाने राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत स्थळ म्हणून पर्याय सुचवला तर त्यावर आस्थाने रिप्लाय करत आपण स्वतःच असे होऊ देणार नाही असे उत्तर देत नाकारले. तर एकाने तिला तू चुकीच्या साईटवर हा शोध घेत आहेत असे सांगून अप्रत्यक्षरीत्या विवाह नोंदणी साईटवर जाण्याचा मार्ग सुचवला मात्र आपण असा पर्याय ट्राय केला होता त्यात यश मिळाले नाही असे सांगत आस्थाने त्यांना उत्तर दिले.

पहा ट्विटर वरील प्रतिक्रिया

दरम्यान, आस्थाने हा शोध केवळ आपल्या आईच्या आनंदासाठी सुरु ठेवला असल्याची माहितीही दिली आहे. तिच्या या विचाराला आणि शोधाला लवकरच एका चांगला उमेदवार मिळो ही सदिच्छा.