प्रेमासाठी काय पण! प्रेयसीच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या मृतदेहाशी केले लग्न; कारण वाचून व्हाल थक्क
यांग लियू ज्यू शिनान (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपण जगातल्या महान प्रेम-कथांविषयी (Love Story) ऐकलच असेल, परंतु आज आम्ही आपल्याला एक अशी प्रेमकथा सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्ही भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. ही घटना आहे चीनमधील (Chine), जिथे एका व्यक्तीने चक्क आपल्या मृत प्रेयसीशी (Fiancée) लग्न केले आहे. या व्यक्तीचे नाव जू शिनान (Xu Shinan)असून, तो 35 वर्षांचा आहे. शिनान आणि त्याची गर्लफ्रेंड यांग लियू (Yang Liu) अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र यांग जिवंत असताना त्यांचे लग्न होऊ शकले नाही. मात्र दोघांचेही लग्नाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शिनानने हे पाऊल उचलले आहे.

2013 मध्ये लग्न करण्यासाठी या दोघांनीही कोर्टात अर्ज केला होता. मान्यता मिळाल्यानंतर तीन महिन्यानंतर यांगला स्तनाचा कर्करोग झाला. त्यानंतर चार वर्षे शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी केल्यावर हा आजार बरा झाला होता. मात्र त्यानंतर एक वर्षानंतर कर्करोग परत आला. पुन्हा कॅन्सर झाल्यावर जू आणि यांगचे लग्न करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. देशातील बर्‍याच मोठ्या रुग्णालयात यांगवर उपचार केले गेले, परंतु प्रकृती सुधारली नाही. यांगची प्रकृती यावर्षी मे महिन्यात आणखी खराब होऊ लागली. जुलैपासून ती रुग्णालयातच होती. या महिन्याच्या 6 तारखेला यांग कोमामध्ये गेली व 14 ऑक्टोबरला तिने अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा: लग्नानंतर अनेक वर्षांनीही असा जपून ठेवा नात्यातील गोडवा)

यांगच्या मृत्युंनंतर शिनानला समजले की  यांगने लग्नाचा ड्रेसही तयार करून घेतला होता. हे पाहून त्याच्या दुःखाचा पारावार राहिला नाही. यांगला त्या ड्रेसमध्ये पाहणे हे त्याचे स्वप्न होते. यांगचे देखील शेवटचे स्वप्न होते शिनानशी लग्न करणे तेच पूर्ण करण्यासाठी त्याने यांगच्या मृतदेहाशी लग्न केले. मृत्यूच्या 1 आठवड्यानंतर दोघांनी अंत्यसंस्कारादरम्यान लग्न केले. यावेळी यांगला तोच लग्नाचा ड्रेस घालण्यात आला होता.