धावत्या ट्रेनसमोरून थोडक्यात वाचला महिलेचा जीव (PC - Twitter)

Viral Video: ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेने जवळपास प्रत्येक स्टेशनवर फूट ओव्हर ब्रिज बनवले आहेत. ज्याद्वारे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर किंवा स्टेशनच्या बाहेर किंवा आत जाता येते. पण कोणी फूट ओव्हर ब्रिजच्या मदतीशिवाय रुळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा धोका ठरू शकतो. तसे करणे म्हणजे जीवावर खेळण्यासारखे आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये रेल्वे कर्मचारी जीवावर खेळून एका महिला प्रवाशाला वाचवताना दिसत आहे. हा प्रकार शिकोहाबाद रेल्वे स्थानकावरील आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये महिला प्रवाशाच्या हातात एक काळी पिशवी आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली दिसत आहे. (हेही वाचा -Swiggy Delivery Girl Viral Video: फूड डिलिव्हरी देण्यासाठी व्हीलचेअर बसून आली दिव्यांग स्विगी गर्ल; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch)

एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ही महिला रुळ ओलांडताना दिसत आहे. दरम्यान, याच ट्रॅकवर एक सुपर फास्ट ट्रेन येत आहे. बाई काही विचार करत होती तोपर्यंत ट्रेन अगदी जवळ आली होती. तेवढ्यात एक रेल्वे कर्मचारी धावत त्या महिलेपर्यंत पोहोचतो आणि तिचे दोन्ही हात पकडून तिला प्लॅटफॉर्मवर ओढतो. हे प्रकरण इथेच संपत नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा सुपरफास्ट ट्रेन तिच्या अगदी जवळून जाते, तेव्हा ही महिला पुन्हा तिची पाण्याची बाटली उचलण्यासाठी धावत्या ट्रेनकडे जाते. रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे या महिला प्रवाशाचा जीव वाचला. व्हिडिओमध्ये रेल्वे कर्मचारी आणि पोलिस महिलेला समजावताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @Sanjay_IRTS यांनी ट्विट केला आहे, जो एक नागरी सेवक आहे.