सापाला जन्म दिल्याचा दावा करणारी महिला मीनादेवी (Photo Credits: Youtube)

Bihar: जगभरात तुम्ही अनेक विचित्र माणसे पाहिली असतील. त्यांना पाहून तुम्ही आश्चर्यचकित होतात. असे काही लोक आहेत जे कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी आपल्या मुलासारखी पाळतात. परंतु, बिहारमधील (Bihar) मुंगेर (Munger) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका महिलेने विषारी सापांना (Poisonous Snake) आपला मुलगा (Son) म्हणून स्वीकारले आहे. इतकेचं नाही तर या महिलेबरोबर राहणारा साप देखील तिचं सर्व काही ऐकतो. या महिलेमधील आणि सापातील आई-मुलाचे हे नाते पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंगेर मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डकरा गावात व्यवसायाने मजूर असलेल्या कृष्णा यादव यांची पत्नी मीनादेवी एका विषारी सापाची काळजी घेते. या सापाला घेऊन ती घरातील सर्व कामे करते आणि साप देखील आज्ञाधारक मुलाप्रमाणे मीनादेवीची आज्ञा पाळतो. मीनादेवीचा असा विश्वास आहे की, हा साप त्यांच्या गर्भातून जन्माला आला आहे. माझ्या गर्भाशयातून तीन सर्प बाळ जन्मले. यात दोन मुलं आणि एक मुलगी आहे. ज्यांचा मी माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ करते. (वाचा - Tiger Viral Video: बर्फ जमलेल्या तलावावर चालताना घडले असे काही आणि चक्क वाघ ही घाबरला; पहा व्हिडिओ)

मीनादेवीने सांगितले की, तिने आपल्या मुलांचे नाव 'आंधी', 'तूफान' आणि 'मेल' असं ठेवलं आहे. यातील आंधी आणि तूफान चा मृत्यू झाला. परंतु 'मेल' मरणार नाही, आता तो नेहमी माझ्याबरोबर राहील. मीनादेवींचे हे शब्द ऐकून गावकरीही चकित झाले आहेत. ही खेड्यातील कुतूहलाची बाब बनली आहे.

विज्ञान या गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी त्या सापाच्या रुपाने तिने तीन मुलांना जन्म दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. परंतु, गावकरीसुद्धा ही घटना सत्य असल्याचे मानतात आणि सर्प आणि त्या स्त्रीचे प्रेम पाहण्यासाठी तिच्या घरी जातात. गावकऱ्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी ऐकले की या महिलेने सर्प बाळाला जन्म दिला आहे, तेव्हा त्यांना यावर विश्वास ठेवला नाही. परंतु, जेव्हा त्यांनी या विषारी सापाला महिलेच्या मांडीवर मुलासारखे खेळताना पाहिले, त्यावेळी सर्व गावकऱ्यांचा विश्वास बसला.

गावकऱ्यांनी सांगितलं की, हा छोटा साप या महिलेचं सर्वकाही ऐकतो. जेव्हा ती त्याला बोलावते, तेव्हा तो जवळ येतो. तिने त्याला दूध पिण्यास सांगितले तर तो दूध पितो. हा साप महिलेबरोबर अगदी मुलासारखे वागतो.