A pregnant woman in Chhattisgarh (PC - ANI)

देशात अनेक ठिकाणी आजही पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचं जाणवतं. ग्रामीण भागात, रस्ते, पुल, वीज, रुग्णालय आदी सुविधा नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एका गर्भवती महिलेचा (A Pregnant Woman) व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गावकरी नदीतून एका गर्भवती महिलेला कावड करून टोपलीत बसवून रुग्णालयात घेऊन जात आहेत.

हा व्हिडिओ छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील आहे. गावात पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना कसरत करत नदी ओलांडावी लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, कडनाई गावातील महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. परंतु, रस्त्यांअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. परिणामी या महिलेला गावकऱ्यांनी कावड करून नदी पार करत रुग्णालयात दाखल केलं. (हेही वाचा - अजब! तार मध्ये अडकून रिक्षाचालक क्रिश सारखा हवेत उडाला अन् महिलेच्या अंगावर जाऊन आदळला; महिलेला पडले 52 टाके (Watch Video))

छत्तीसगड राज्यात आजही असे अनेक गावे आहेत, जेथे पायाभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. यापूर्वीदेखील अशा घटना घडलेल्या आहेत. वेळेवर पायाभूत सुविधा न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.