A Passenger who jumped moving metro (PC- Twitter/@HowThingsWork_)

Viral Video: मेट्रोमध्ये प्रवास करताना बहुतांश लोक नियमांचे पालन करतात आणि या नियमांचे पालन करणं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तथापि, असे काही लोक आहेत जे असे करणे योग्य समजत नाहीत. अनेकदा ते नियम मोडत असतात. मात्र, त्यांना याची चांगलीचं किंमत चुकवावी लागते हेही तितकचं खरं आहे. नुकताच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रो स्टेशनवर चालत्या मेट्रोचे दरवाजे उघडून उडी मारताना दिसत आहे. मात्र, या व्यक्तीला असे करणे किती धोकादायक ठरले असेल, याचा अंदाज व्हिडिओ पाहूनच लावता येऊ शकतो.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती चालत्या मेट्रोच्या आत उभा आहे आणि अचानक तो हाताने मेट्रोच्या डब्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. कसा तरी हा दरवाजा उघडल्यावर ही व्यक्ती चालत्या मेट्रोतून स्टेशनवर उडी मारते. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. (हेही वाचा - Robot Video: माणसासारखा चालणारा, उडी मारणारा आणि धावणारा रोबट; त्याच्या लिला पाहून तुम्हीही व्हाय चकीत, पाहा व्हिडिओ)

हा व्हिडिओ @HowThingsWork_ नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत 8.6 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 187.2 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून 19 हजारांहून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.