Romona Old Painting Auction: एका महिलेने एका दुकानातून 300 रुपयांना सेकंड हँड पेंटिंग (Painting) विकत घेतली. ही पेंटिंग तिने आपल्या घरी नेली आणि नंतर तिने ती पेंटिंग स्टोअर रूममध्ये ठेवली. एक दिवस महिलेने या पेंटिंगचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर तिला समजलं की, हे पेंटिंग खूप खास आहे. यानंतर महिलेला या पेंटिंगच्या बदल्यात दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली. कदाचित तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. मात्र, ही घटना खरी असून हे प्रकरण न्यू हॅम्पशायरचे आहे. येथील महिलेने 2017 मध्ये मँचेस्टरमधील एका दुकानातून सुमारे चार डॉलर्स (आजच्या नुसार 332 रुपये) हे पेंटिंग विकत घेतले होते. या महिलेने सांगितले की, मी हे पेंटिंग सामान्य असल्याचे समजून खरेदी केले आहे. नंतर असे उघड झाले की हे साधे चित्र प्रसिद्ध चित्रकार एन.सी. व्याथ यांचे असून ते फार पूर्वी हरवले होते.
सीबीएस न्यूजनुसार, रामोना नावाची पेंटिंग हेलन हंट जॅक्सनच्या 1884 मधील कादंबरीच्या 1939 आवृत्तीसाठी तयार केलेल्या चार पेंटिंगपैकी एक आहे. पेंटिंगमध्ये एक तरुणी एका वृद्ध महिलेशी बोलताना दाखवली आहे. (हेही वाचा - VIDEO: ऐकावं ते नवलंच! Berlin मध्ये एकत्र आले स्वतःला 'कुत्रा' समजणारे शेकडो लोक; भुंकत, आरडओरडा करत साधला एकमेकांशी संवाद (Watch))
View this post on Instagram
बोनहॅम्स ऑक्शन हाऊसने या पेंटिंगची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. असे लिहिले होते की, हे एक हरवलेले N.C. वायथची पेंटिंग, 19 सप्टेंबर रोजी बोनहॅम स्किनर येथे लिलावासाठी येत आहे. 2017 मध्ये एका दुकानातून 4 मध्ये खरेदी केलेले हे पेंटिंग नंतर प्रसिद्ध अमेरिकन कलाकाराचे असल्याचे आढळून आले. ही पोस्ट 6 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.