नजर हटली, दुर्घटना घडली अशा आशयाचे फलक रस्त्याच्या कडेला लावलेले आपण नेहमी प्रवास करताना पाहिले आहे. वाहन चालवत (Driving) असताना मोबाईल फोनचा (Mobile) वापर टाळावे, असे या फलकातून वाहनचालकांना आवाहन केले जाते. कारण, फोनचा वापर करत असताना वाहन चालकाचे लक्ष विचिलित होण्याची शक्यता असते. ज्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. याचपार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संबंधित व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत आहे. परंतु, यामुळे त्या व्यक्तीला भलतेच परिणाम भोगावे लागले आहेत. तसेच हा व्हिडिओ सर्वांना चांगली शिकवण आणि सावधान करणारा ठरणार आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर जट्ट लाइफ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सामायिक झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. त्याला आतापर्यंत 4 हजाराहून अधिक दृश्ये मिळाली आहेत. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने शिकले पाहिजे, कारण अशा निष्काळजीपणामुळे असे अपघात घडण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Mask Up! धर्मशाला मध्ये चिमुकला देतोय नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला; पहा हे निरागस आवाहन
इंन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एक व्यक्ती स्कूटर चालवत आहे. परंतु, स्कूटर चालवत असताना मोबाईलवरही बोलत आहे. मोबाईलवर बोलत असताना आपण कुठे जात आहोत, याचे त्याला भान राहिले नाही. याचदरम्यान, त्याचे स्कूटीवरील नियंत्रण सुटले. अखेर सिग्नलजवळ असताना तो स्कूटीवरून खाली पडला आहे. या घटनेतून आपणास बऱ्याच गोष्टी शिकता येणार असून वाहन नियमांकडे दुर्लक्ष करणे आपल्या जीवावर बेतू शकते.