फ्लोरिडा पार्क मध्ये मोठ्या संख्येने Sex करणा-या सापांच्या भीतीपायी बंद ठेवण्यात आला गार्डनचा काही भाग
Florida park Snake (Photo Credits: Facebook)

सापांची प्रणयक्रिडा पाहायला मिळणे हा खूपच दुर्मिळ क्षण आहे. मुळात त्यांच्या प्रणयक्रिडेचा विशिष्ट कालावधी असतो. मात्र दुर्लभ क्षण आलेला अमेरिकेतील फ्लोरिडा पार्कमध्ये (Florida Park). जेथे मोठ्या संख्येने सापांचे Sex (Snake Sex) सुरु होते. त्यामुळे तेथे आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेपायी आणि प्रणयक्रिडा करणा-या सापांना अडथळा येऊ नये यासाठी तेथील सुरक्षारक्षकांनी ते पार्कमधील लेक हॉलिंग्सवर्थ (Lake Hollingsworth) त्यांची प्रणयक्रिडा संपेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. अचानक हे पार्क बंद करण्यात आल्यामुळे तेथे आलेले पर्यटकही संभ्रमात पडले. पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथील सुरक्षा रक्षकांनी आणि व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला.

फ्लोरिडा पार्क मधील हॉलिंग्सवर्थ तलावाजवळ मोठ्या संख्येने आलेल्या सापांचे Sex सुरु होते. किंबहुना तो त्याचा मिलनाचा काळ असतो असे सांगण्यात येत आहे. अशावेळी त्यांच्या प्रणयक्रिडेत कुठलाही अडथळा येऊ नये तेथील पार्क व्यवस्थापनेने तो भाग काही काळासाठी बंद ठेवला होता.

हेदेखील वाचा- दलदलीत अडकलेल्या तरुणाला माकडाने दिला मदतीचा हात; रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा 'हा' फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

तेथील आलेल्या लोकांच्या उत्सुकतेमुळे तिथे काहीतरी अनुचित प्रकार घडेल या भीतीपायी तेथील व्यवस्थापनेने हे खबरदारीचे पाऊल उचचले.फ्लोरिडा तील पाण्यातील सापांचा (Florida Water Snake) चा हा मिलनाचा काळ असतो असे तेथील लोकांकाडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या गोष्टीची माहिती देण्यासाठी तेथील प्रशासनाने फेसबुकच्या माध्यमातून याबाबत लोकांना माहिती दिली. जेणेकरुन त्या भागात नेमकं काय झालं याची माहिती तेथील नागरिकांना मिळाली.

सापांची प्रणयक्रिया संपेपर्यंत तो भाग बंद ठेवण्यात आला होता. हे साप मुख्यत्वे झाडाच्या फांदीवर वा तलावाच्या किना-यावर पाहायला मिळतात, असे सर्प विभागाकडून सांगण्यात येत आहे.