Viral King Cobra Video: पावसाळ्यात अनेकदा साप त्यांच्या बिलातून किंवा जंगलातून बाहेर पडतात आणि निवासी भागात प्रवेश करतात. मानवी वस्तीत धोकादायक साप पाहून भीतीने लोकांचा जीव वर खाली हॉट असतो, अशा परिस्थितीत त्यांना सर्प पकडणाऱ्यांची मदत घ्यावी लागते. किंग कोब्रासारखे साप प्राणघातक असतात यात शंका नाही. दरम्यान, कर्नाटकातील किंग कोब्रा सापाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महाकाय किंग कोब्राला पाहून गावातील लोकांची अवस्था बिकट झाली आहे. वन्यजीव अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खूप प्रयत्नांनंतर अखेर सापाला सोडवले, नंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले.
इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ कर्नाटकातील अगुंबे येथील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे वन्यजीव अधिकाऱ्यांनी 12 फूट लांबीच्या विशाल किंग कोब्राची सुटका केली आणि त्याला जंगलात सोडले. किंग कोब्रा स्थानिक लोकांनी रस्ता ओलांडताना पाहिला होता, त्यानंतर तो घराच्या आवारातील झाडीत लपला होता. हेही वाचा: Viral Video: बुटाच्या आत फेरा घालून लपून बसलेला किंग कोब्रा.
व्हायरल व्हिडिओ पहा:
View this post on Instagram
साप पाहिल्यानंतर घराच्या मालकाने तत्काळ वनविभाग आणि अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनला (एआरआरएस) माहिती दिली. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर टीमने सापाच्या बचावकार्याला कशी सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर सापाला रॉडच्या साहाय्याने झुडपातून खाली आणून रेस्क्यू बॅगमध्ये ठेवून जंगलात सुखरूप सोडण्यात आले.