A Frog Found In Peppers at Canada (PC - twitter)

सोशल मीडियावर नेहमी विचित्र घटनाचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाचं एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क शिमला मिर्चीमध्ये (Capsicum) जिवंत बेडूक (Frog) सापडला आहे. आता हा फोटो पाहून प्रत्येकाला प्रश्न पडतं आहे की, हा बेडूक शिमला मिर्चीत गेलाचं कसा? यापूर्वी कोबीमध्ये किडे सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, आता शिमला मिर्चीमध्ये किडे नाही तर बेडूक सापडल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो कॅनडामधील आहे. कॅनडातील एका दाम्पत्याला जेवण तयार करताना शिमला मिर्चीमध्ये जिवंत बेडूक सापडला. यासंदर्भात कॅनडातील काही स्थानिक वृत्त संस्थांनी बातम्या दिल्या आहेत. त्यानंतर या शिमला मिर्चीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - काय सांगता..! चक्क बेडकाने सापाला खाल्लं? पाहा थरारक व्हिडिओ)

कॅनडामधील निकोल गागन आणि गेरार्ड ब्लॅक हे स्वयंपाक बनवत असताना त्यांना शिमला मिर्चीत जिवंत बेडूक आढळला. त्यानंतर निकोल यांनी ही शिमला मिर्ची कॅनडातील क्यूबेक येथील कृषी, मत्स्य आणि अन्न मंत्रालयाकडे पाठवली आहे. सध्या सोशल मीडियावर याचं शिमला मिर्चीचा फोटो व्हायरल होत असून नेटीझन्स त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आता शिमला मिर्ची खाण्याची भिती वाटते, असंही एका युजर्सने म्हटलं आहे.