ऐकावे ते नवलच! पोलिसांकडे बघून जोरात पादल्याने तब्बल 43 हजाराचा दंड; जाणून घ्या नक्की काय घडले
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगात पादण्या (Farting) संदर्भात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी पादल्यामुळे अनेकांना वासाचा त्रास होतो, यामुळे अगदी संसदेचे कामकाज स्थगित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पादामुळे एखाद्याला दंड (Fine) झाला आहे, असे कानावर आले नसेल. मात्र आता ही गोष्टही घडली आहे. हवा सोडल्याबद्दल ऑस्ट्रियाच्या (Austria) पोलिसांनी एका व्यक्तीला 500 युरोचा (सुमारे 43000 रुपये) दंड ठोठावला आहे. व्हिएन्ना (Vienna) येथे ही विचित्र घटना घडली आहे. हा माणूस मोठ्याने पोलिसांसमोर पादला, त्यामुळे पोलिसांनी त्याला दंड ठोठावला.

The Oesterreich वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही घटना 5 जून रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पोलीस आणि या व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ही व्यक्ती बाकावर उभी राहिली व जाणूनबुजून पोलिसांकडे पाहत जोरात हवा सोडली. पोलिसांपैकी एकाला हे वागणे पटले नाही व या व्यक्तीला दंड ठोठावला. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा दंड फक्त याच कारणासाठी नसून, पोलिसांशी केलेल्या चिथावणीखोर आणि अप्रिय वागणुकीमुळे ठोठावण्यात आला आहे. (हेही वाचा: संसदेत सदस्याच्या पादण्याच्या उग्र वासामुळे कामकाज 10 मिनिटासाठी केले तहकूब, संसदेत मारावा लागला रुम फ्रेशनर)

दरम्यान, केन्या येथे होमा बे काउंटी संसदेत (Assembly) मध्ये एक सदस्य असा पादला होता की, त्याच्या उग्र वासामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. अजून एका घटनेमध्ये  युगांडा (Uganda) येथील एका व्यक्तीच्या पादावर संशोधन होणार आहे. जो रिवामीरामा (Joe Rwamirama) असे या व्यक्तीचे नाव आहे. जो रिवामीरामाच्या पादामुळे चक्क डास पळून जाजत किंवा ते मरतात, असे निदर्शनास आले आहे. या व्यक्तीच्या गूढ पादाचे रसस्य जाणून घेण्यासाठी एका कंपनीने जो रिवामीरामाशी करार केला आहे.