Kolkata: COVID-19 वर मात केल्यानंतर 75 वर्षीय वृद्ध महिला झाली भावूक; डॉक्टरांना मारली मिठी (See Viral Pics)
महिला रुग्णाने डॉक्टरांना मारली मिठी (Photo Credits: Facebook)

Viral Photo: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) प्रादुर्भाव देशात वेगाने पसरत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. कोरोना संकटांच्या (Corona Crisis) काळात डॉक्टर आणि सर्व वैद्यकीय कर्मचारी सतत फ्रंटलाइन योद्धा म्हणून रूग्णांची (Corona Patients) सेवा करत आहेत. डॉक्टरांच्या सेवा आणि अथक प्रयत्नांमुळे बहुतेक रुग्णही जलद बरे होत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक चित्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक 75 वर्षीय महिला कोरोनाला हरवून इतकी भावनिक झाली आहे की, तिने डॉक्टरला मिठी मारली. महिला रुग्ण आणि डॉक्टरांचा हा भावनिक फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

कोलकाताच्या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील हे छायाचित्र फेसबुक युजर्स तन्मय डे यांनी पोस्ट केले आहे. यासह, बंगाली भाषेत शीर्षक देण्यात आहे की, 10 दिवस कोविडशी लढा दिल्यानंतर 75 वर्षांची आजी सावरली आहे. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे झाल्यानंतर या महिलेने आनंदाने तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरला मिठी मारली. या बरोबरचं महिलेने डॉक्टरांना प्रेमाने आशीर्वाद दिला. (वाचा - VaccinRegis App वर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते? पहा PIB Fact Check ने या व्हायरल मेसेजवर दिलेली माहिती)

महिला रुग्णाने डॉक्टरांना मारली मिठी (Photo Credits: Facebook)

या पोस्टला 2000 हून अधिक शेअर्स आणि लाईक्स मिळाल्या आहेत. यासह हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या रुग्णांची सेवा केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले आहेत. या फोटोत पीपीई किटमध्ये घातलेल्या डॉक्टरांना एक वृद्ध महिला मिठी मारताना दिसत आहे. यावेळी ही महिला खूपचं भावनिक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले.