PIB Fact Check: एसडीआरएफ अंतर्गत कोविड 19 मुळे मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार? जाणून घ्या या वायरल मेसेज मागील सत्य
Fake News| Photo Credits: PIB Fact Check

भारत कोरोना संकटाच्या दुसर्‍या लाटेशी (COVID 19 Second Wave) सामना करत असताना आता अनेकजण अफवा, खोट्या बातम्यांशी देखील मुकाबला करत आहे. रोजच सोशल मीडियात फेक न्यूजची चर्चा असते त्यामुळे नक्की खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती हा संभ्रम अनेकांना असतो. सध्या अशाच खोट्या बातम्यांपैकी एक म्हणजे कोरोनामुळे (COVID 19)  मृत्यू झाल्यास एसडीआरएफ कडून 4 लाखांची मदत मिळणार. दरम्यान ही बातमी खोटी असून पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) त्याची सत्यता पडताळली आहे.

दरम्यान कोविड 19 मुळे मृत्यू झाल्यास एसडीआरएफ तुम्हांला मदत करेल असा मेसेज तुम्हांलाही मिळाला असेल तर त्यापासून दूर रहा कारण अशी आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही किंवा प्रस्ताव नाही. हा खोडसाळपणा केवळ अफवा पसरवण्यासाठी, नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आला आहे. VaccinRegis App वर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते? पहा PIB Fact Check ने या व्हायरल मेसेजवर दिलेली माहिती.

PIB Fact Check Post

वायरल न्यूज मध्ये 4 लाख रूपये मदत देण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबत एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म देखील वायरल होत आहे. त्यामध्ये नाव,आधार नंबर, मोबाईल नंबर विचारण्यात आला आहे. दरम्यान ही सारी माहिती खाजगी आहे. याचा वापर करून तुम्हांला लुबाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे ही माहिती तुम्ही कुठे देत आहेत त्याबाबत सावध रहा.