Pet Dog Birthday Celebration: मेरठमध्ये पाळीव कुत्रा अॅलेक्सच्या वाढदिवसाला मालकाने कापला 11 किलोचा केक; कार्यक्रमाला 300 पाहुण्यांची उपस्थिती, रिटर्न गिफ्ट म्हणून दिला फ्रीज
Dog | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pet Dog Birthday Celebration: प्राध्यापक शमीम अहमद यांनी आपलं जीवन प्राणी कल्याणासाठी समर्पित केलं आहे. ते त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग प्राण्यांवर खर्च करतात. त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्या (Pet Dog) अॅलेक्सचा वाढदिवस (Alex's Birthday) मोठ्या थाटामाटात साजरा केला. या वाढदिवसाला तीनशेहून अधिक पाहुणे सहभागी झाले होते. अॅलेक्सच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या लहान मुलांनी आणि मोठ्यांनी पार्टीत आईस्क्रीम, चाट, छोले भटुरे, टिक्की आणि चाऊमीनचा आनंद लुटला.

ट्रान्सलाम कॉलेजमधील फार्मसी विभागाचे निवासी प्राध्यापक डॉ. शमीम अहमद यांच्याकडे अॅलेक्स सेंट बर्नार्ड जातीचा कुत्रा आहे. डॉ अहमद त्याच्यावर खूप प्रेम करतात. शमीन यांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठवून पाहुण्यांना आमंत्रित केले. (हेही वाचा -Strange Fish: समुद्रात विचित्र माशाचा चेहरा पाहून तुमचेही उडतील होश, तुम्हीही बघा हा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ)

कुत्र्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत अॅलेक्सच्या उपस्थितीत 11 किलोचा केक कापण्यात आला. पाहुण्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. देश-विदेशात राहणारे डॉ.अहमद यांचे बंधू आणि शिष्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. पाहुण्यांनी विविध भेटवस्तू आणल्या. सर्वांना रिटर्न गिफ्ट्स देण्यात आले.

लकी ड्रॉवर अनस या पाहुण्याला रिटर्न गिफ्ट म्हणून फ्रीज देण्यात आला. दुसरा पाळीव कुत्रा रिम देखील पार्टीत सामील झाला. दरम्यान, सकाळी डॉ. अहमद यांनी स्वत: रस्त्यावरील निराधार जनावरे, गायी, कुत्रे, माकडे यांना अन्न दिले.