Waaka Waaka म्हणणारी शकिरा जेव्हा 'आनंदी गोपाळ'च्या 'वाटा वाटा' गाण्यावर थिरकते, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
Anandi Gopal Song ( Photo Credits: You Tube)

Anandi Gopal Song Waata Waata Waata Ga Video Memes: भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी (Dr.Anandibai Joshi) यांच्या आयुष्यावर 'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) हा आगामी सिनेमा 15 फेब्रुवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील दमदार डायलॉग्सची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. 'आनंदी गोपाळ' सिनेमाच्या टीझरवरून जसे मिम्स बनले तसेच 'वाटा वाटा..' या गाण्यावर बनलेला व्हिडीओ मिम देखील सध्या सोशलमीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. ' वाका वाका' गाणारी शकीरा चक्क ' वाटा वाटा' वर थिरकत आहे. Anandi Gopal Trailer: गोपाळराव आणि डॉ.आनंदीबाई जोशी या सामान्य जोडीचा असामान्य प्रवास उलगडणार 'आनंदी गोपाळ',पहा दिमाखदार ट्रेलर

शकीराचा व्हिडीओ मिम -

'वाटा वाटा' हे आनंदी गोपाळ सिनेमातील एक हळुवार गाणं आहे. शिक्षणाची कास धरलेल्या आनंदीबाई जोशी यांच्या मनातील भावना या गाण्यातून मांडल्या आहेत. प्रियंका बर्वे या गायिकेने हे गाणं गायलं आहे. शकीराच्या अंदाजात हे गाणं भाग्यश्री मिलिंद सह प्रियांकानेही इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.  'आनंदी गोपाळ' सिनेमाच्या टीझर वरून बनवलेले धम्माल Memes सोशल मीडियावर व्हायरल!

झी स्टुडिओ प्रस्तुत 'आनंदी गोपाळ' या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर गोपाळरावांची भूमिका साकारत आहे तर आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंद झळकणार आहे. समीर विध्वंस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.