Mumbai Accident: एका कारच्या अपघातात (Accident) तरुणाचा मृत्यू झाल्याने वनराई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पिता पुत्राला अटक केले आहे. गुरुवारी गोरेगाव येथील रस्त्यावर कारची आणि मोटारसायकलची धडक झाली. स्कॉर्पिओ कार अल्पवयीन मुलगा चालवत होता. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. वाहनाचा मालक असलेला इकबाल जीवनी आणि त्यांचा मुलगा मोहनाद दिवानी यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा- कॅबची ऑडीला धडक, दोघांकडून ड्रायव्हरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ कार चालवणाऱ्या १७ वर्षीय अदनान खानला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. कारचालक दारूच्या नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. कारची धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुण खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तो दारूच्या नशेत होता असा संशय व्यक्त केला जातो.
अपघात कसा झाला
गोरेगावच्या दिशेने वैशन मोटारसायकलवरून जात होता. त्यावेळीस स्कॉर्पिओ विरुध दिशेने येत होती. भरधाव कारची मोटारसायकला धडक लागली. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार विजेच्या खांबाला धडकली आणि चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.