Youth Arrested For Defaming Uddhav Thackeray: सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारा तरूण अटकेत
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सोशल मीडियावर (Social Media) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव (CM Uddhav Thackeray) यांची बदणामी करणाऱ्या तरूणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. समित ठक्कर असे आरोपीचे नाव असून त्याने गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी सुरु केली होती. याप्रकरणी युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 1 ऑक्टोबर 2020 रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो असे सांगून पळून गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.

समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. तसेच तो गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अपमानित करणारा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करत होता. त्यावेळी धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर समित हा पोलिसांना हाती लागत नव्हता. दरम्यान, कोर्टाने आरोपी समित याला वी. पी. रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्याचा लॅपटॉप आणि मोबाईलदेखील पोलिसांच्या ताब्यात सांगितले होते. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. मात्र, काही वेळातच बाथरुमला जातो असे सांगून त्याने तिथून पळ काढला. मात्र, आज अखेर त्याला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. हे देखील वाचा- Dussehra 2020: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयादशमीच्या जनतेला शुभेच्छा

याआधी उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिल्लीतील एका वकिलाला अटक केली होती. शिवसेनेचे कायदेशीर सेल प्रमुख धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर विभोर आनंद याला अटक करण्यात आली होती.