प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील राळेगाव (Ralegaon) तालुक्यात रविवार 20 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासहित अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गुजरी (Gujari)  येथे अचानक वीज कोसळली आणि याच दुर्घटनेत सहा जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील हे सहा जण असून त्यांचा वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गुजरी गावात दुःख आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी काल, रात्री विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याच पावसात ही दुर्घटना झाली आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाची कुऱ्हाड

प्राप्त माहितीनुसार, राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील गोंडे यांच्या शिवारात कुटुंबातील सहा जणांच्या अंगावर वीज कोसळली.आणि यातच या सहा जणांचा मृत्यू झाला. मात्र ही घटना थेट सोमवारी सकाळी उघडकीस आली. मृत व्यक्तींमध्ये त्यात चार पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. मृतांची नावं अद्याप उघड केलेली नाही.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु होता. मागील आठवड्यात पुणे येथे तर सलग तीन दिवस पाऊस झाला होता. मध्य महाराष्ट्र, कोकण,विदर्भ , मराठवाडा या भागातही पाऊस होणार असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले होते.