Yavatmal Flood: गेल्या काही दिवसांपासून राज्य भरात पावसानी बॅटींग सुरु केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची जनजीवन विस्कळित झाली आहे. गावात, शहरातील नद्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने नागरिक हैरान झाले आहेत. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर माजला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे आणि काही ठिकाणी संततधार चालू आहे. विदर्भात दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह पावसाने थैमान घातले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांड्यातील गावकरी पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच उपमुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. त्याच्या मदतीने तात्काळ नागरिकांना मदतीची साथ मिळाली आहे. पूरामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2023
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर वरून दिली.
#WATCH | Maharashtra: Houses, roads in Yavatmal submerged in water due to incessant rain in the region. pic.twitter.com/9Hus9bezuB
— ANI (@ANI) July 22, 2023
यवतमाळच्या महागावमध्ये पुरात अडकलेल्यांची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली, हवामान सुधारल्यानंतर बचावकार्य सुरू होईल. यवतमाळ जिल्ह्यात घराच्या भिंती कोसळून २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच वेगवेगळ्या ठिकाणी एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू अशी माहिती यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे यवतमाळ येथील दिग्रस परिसरात देखील पूर आले आहे. दिग्रस येथील आजूबाजूच्या गावात पूर आल्याचे समोर आले आहे. गावातील घरे, मंदीरे पूरा खाली गेले आहे.