यवतमाळ येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या, चिठ्ठीत भाजप-शिवसेना जबाबदार असल्याचा खुलासा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

यवतमाळ (Yavatmal) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे कंटाळून शुक्रवारी विष प्राशन करुन आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी त्यांने लिहली असून त्यामध्ये माझ्या आत्महत्येसाठी भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) जबाबदार असल्याचे म्हटल आहे.

पांढरकवडा येथे राहणारे धनराज नव्हाते असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतजमीन नापिक आणि कर्जबाराला नव्हाते अतिशय कंटाळले होते. तसेच नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर तब्बल 2 लाख रुपयांचे सावकाराचे कर्ज झाले होते. या सर्व प्रकाराला कंटाळून नव्हाते यांनी आपले आयुष्य संपवले. तसेच चिठ्ठीत सरकारला धारेवर धरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(हेही वाचा-राज्यामध्ये गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दुप्पटीने वाढले)

गेल्या काही वर्षांपासून नव्हाते यांना शेतीत फार मोठे नुकसान सहन करावे लागत होते. तर बुधवारी मुलीला भेटण्यासाठी सासरी निघालेले नव्हाते दुसऱ्या दिवसापर्यंत घरी आले नव्हते. त्यामुळे घरातील मंडळींनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना नव्हाते यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील खड्ड्यात सापडला.