देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे अशा वारंवार सुचना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजरांच्या पार गेला आहे. तर राज्यातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विळख्यात अडकले असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता काही समाज कंटकांकडून सोशल मीडियात कोरोना संबंधित खोटी माहिती आणि अफवा पसरवली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यवतमाळ येथे आणखी 15 जणांचा कोरोनाची लागण झाली असून आकडा 30 वर पोहचल्याची माहिती सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. परंतु ही माहिती खोटी असून प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती असताना त्यासंदर्भात खोटे मेसेज आणि अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तर कोरोनाचे महासंकट राज्यावर ओढावले असून त्याच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही जण कोरोना्या परिस्थितीचा फायदा घेत नागरिकांची लूट आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्हायरल मेसेज किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवून त्याला बळी पडू नये असे सांगण्यात आले आहे.(मुंबई: विले पार्ले येथील पोलीस स्थानकात कार्यकरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन)
जिल्हा माहिती कार्यालय, #यवतमाळ
‘आणखी 15 जण पॉझेटिव्ह, एकूण रुग्ण संख्या 30 वर’ या शिर्षकाची ब्रेकींग न्यूज व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरत आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांसदर्भात किंवा पॉझेटिव्ह रिपोर्ट संदर्भात अशी कोणतीही माहिती प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आली नाही.#FakeNews
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI (@InfoDivAmravati) May 22, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा 41642 वर पोहचला असून एकूण 1454 जणांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. तर रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत.