विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत (Maharashtra MLC Elections 2020 Results) मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीचे कौतुक केले. दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर बोट दाखवल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्या मित्रपक्षातील राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
"महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना आवाहन करते की महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असल्याच काँग्रेसच्या नेतृत्त्वावर भाष्य करणं टाळा. प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा, असं यशोमती ठाकूर यांनी ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. हेदेखील वाचा- Maharashtra MLC Election 2020 Results: तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने विजय; एकटे लढण्याची हिंमत नाही, चंद्रकांत पाटील यांचा महाविकासआघाडीला टोला
आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 5, 2020
काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 5, 2020
दरम्यान शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. "काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार आहात. तुमच्या प्रमुख नेत्याला तुमचा सहकारी पक्ष किंमत देत नही म्हणजे सत्तेसाठी तुम्ही तुमच्या नेत्याची किंमत करत नाही असा अर्थ होतो" अशी टिका निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.