WR Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 2525 गाड्या  26 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत रद्द
Mumbai Local | (File Image)

मुंबई (Mumbai) मध्ये पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खार (Khar) आणि गोरेगाव (Goregaon) स्थानकादरम्यान सहाव्या लाईनचे काम जोरात सुरू आहे. 8.8 किमी लांबीची लाईन टाकण्याचं काम रेल्वेने हाती घेतलं आहे. भविष्यात यामुळे अधिक रेल्वे धावू शकणार आहेत. रेल्वे सेवेमधील समयसुचकता वाढणार आहे. मात्र या कामासाठी सध्या रेल्वेकडून मोठे ब्लॉक घेतले जात आहेत. यापूर्वी 7 ऑक्टोबरला एक ब्लॉक झाल्यानंतर आता नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 26 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत काही ट्रेन रद्द केल्या जाणार आहेत. Mumbai Western Railway: धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनचा डबा कपलींग निघाल्याने विलग, मोठा अनर्थ थोडक्यात टळला .

पश्चिम रेल्वे मार्गावर 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यानच्या कामासाठी जवळपास 2525 रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून बाहेरगावी जाणार्‍या काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम झाला आहे.. त्यामुळे तुम्ही बाहेर फिरायला जाण्याच्या दृष्टीने काही रेल्वे बुकिंग करण्याच्या विचारात असाल तर रेल्वेच्या वेळापत्रकातील हे बदल नक्की जाणून घ्या.

इथे पहा संपूर्ण यादी

मुंबई मध्ये वेगवान प्रवासासाठी अनेकांची पसंत ही मुंबई लोकल असते. त्यामुळेच लोकल सेवेला मुंबईची लाइफलाईन संबोधलं जातं. कामासाठी, नोकरीधंद्यासाठी लाखो नागरिक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. हाच प्रवास सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी सध्या विविध कामं हाती घेण्यात आली आहे. प्रामुख्याने रविवारी मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेची दुरूस्तीची आणि देखभालीची कामं केली जातात.