Mumbai Local | (Photo Credit - ANI/X)

Mumbai Local News: मुंबई उपनगरी रेल्वे (Mumbai Suburban Local) लोकल ट्रेनचा डबा अचानक विलग झाल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना मरीन लाईन्स रेल्वे स्थानकात घडली. बारा डबे असलेली एक लोकल स्थानकात शिरतानाच कपलींग निघाल्याने हा प्रकार रविवारी (22 ऑक्टोबर) सकाळी 11.2 वाजता घडला. घडला. ज्यामुळे लोकलचे दोन भाग होऊन काही भाग पुढे गेला. तर काही जागेवरच राहिला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी लोकलमध्ये प्रवासी होते. लोकल आणि फलाटावरील प्रवाशांनी ही घटना पाहून जोरदार आरडाओरडा आणि गोंधळ सुरु केला. त्यानंतर लोकल थांबविण्यात आली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ज्या लोकलसोबत हा प्रकार घडला ती चर्चगेटवरुन सकाळी 10.57 वाजता बोरिवली स्टेशनसाठी निघाली होती. याच वेळी डाऊन धिम्या मार्गावरुन प्रवास करत असतान ही लोकल अचानक विस्कळीत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. विस्कळीत झालेली लोकल तातडीने रिकामी करण्यात आली. त्यानंतर ती तातडीने कारशेडमध्ये दाखल करण्यात आली. या प्रकारानंतर डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

मुंबई लोकल रेल्वे वाहतूक, ज्याला "मुंबई लोकल" म्हणून संबोधले जाते.हा शहराच्या वाहतूक नेटवर्कचा एक प्रतिष्ठित आणि आवश्यक भाग आहे. लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि जगातील सर्वात व्यस्त उपनगरीय रेल्वे प्रणालींपैकी एक आहे. मुंबई लोकल रेल्वे नेटवर्कला अनेकदा "मुंबईची लाईफलाइन" म्हटले जाते. हा शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. जो सर्वात दूरच्या उपनगरांना गजबजलेल्या शहराच्या केंद्राशी जोडतो. मुंबई लोकल रेल्वे प्रणालीमध्ये तीन प्रमुख मार्गांचा समावेश आहे. वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईन, पुढे अनेक उपनगरीय मार्गांमध्ये शाखा आहेत. हे विस्तृत नेटवर्क संपूर्ण महानगर क्षेत्र व्यापते, ज्यामुळे ते शहर आणि उपनगरातील प्रवाशांसाठी प्रवेशयोग्य बनते.

एक्स पोस्ट

मुंबई लोकल त्यांच्या आश्चर्यकारकपणे उच्च प्रवासी घनतेसाठी ओळखल्या जातात. गर्दीच्या वेळेत ट्रेनमध्ये अनेकदा गर्दी असते, प्रवासी दरवाज्यावर लटकून प्रवास करतात. लाखो मुंबईकर त्यांच्या कामासाठी, शाळा आणि इतर विविध गंतव्यस्थानांच्या दैनंदिन प्रवासासाठी लोकल ट्रेनवर अवलंबून असतात. शहरातील कुख्यात वाहतूक कोंडी लक्षात घेता गाड्या हा वाहतुकीचा खर्च-प्रभावी आणि वेळेची बचत करणारा मार्ग आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. मुंबईमध्ये योग्य ट्रेन पकडण्यासाठी वक्तशीरपणा महत्त्वाचा असतो.