Worm found in Cadbury PC X

 Worm found in Cadbury: कॅडबरी हा पदार्थ सर्वांनाच आवडीचा. याच कॅबडरीत अळी आढळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्या कॅडबरीमध्ये किडा आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याने X वर या संदर्भात पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टवर  मॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी दु: खाची भावना व्यक्त केली आहे.  (हेही वाचा- महिलेने लावला अप्रतिम शोध, इंडक्शनवर देसी स्टाईलमध्ये भाजल्या पोळ्या, येथे पाहा व्हिडीओ)

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी अलीकडेच X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्यांनी कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळून आली. १९ सप्टेंबर रोजी त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कॅडबरी कंपनीवर संताप व्यक्त केला. त्याने पोस्टमध्ये लिहले की, माझ्या कॅडबरीमध्ये अळी आढळून आली. मी एक निष्ठांवत ग्राहक आहे.  @CadburyWorld कृपया याकडे लक्ष द्या!"आता पर्यंतचा सर्वात खराब अनुभव. अत्यंत निराशा व्यक्त केली आहे.

या पोस्टनंतर कॅडबरी कंपनीने त्वरीत प्रतिसाद दिला आहे. मॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे कॅडबरी इंडिया लिमिटेड) उच्च दर्जाची पदार्थ राखण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला अनुभव आला याबद्दल आम्ही दु: ख व्यक्त करतो असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.