Women's Day: आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. तर स्त्रियांना समाजात नेहमीच आदराने वागवण्यासह तिच्या कतृत्वाला सलाम करण्यासाठीचा आजचाच नव्हे तर प्रत्येक दिवस सारखाच ठरेल. अशातच मुंबईतील ऐतिहासिक अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकाला 'जागतिक महिला दिना'निमित्त गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानक दिव्यांच्या रोषणाईने उजळून आले आहे. तर याच दिनाचे औचित्य साधत एका स्थानिक महिलेने सीएसएमटी रेल्वे स्थानकाला करण्यात आलेल्या रोषणाई बद्दल आनंद व्यक्त केला आहे.
स्थानिक महिलेने असे म्हटले आहे की, सीएसएमटी स्थानकाला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आल्याने खुप आनंदित वाटत आहे. तसेच रेल्वे स्थानक ही खुप सुंदर दिसत असल्याचे तिने म्हटले आहे. (Happy Women's Day 2021 Images: जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status च्या माध्यमातून करा नारीशक्तीला सलाम)
Tweet:
Maharashtra: Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj Terminus illuminated on #WomensDay
"We are happy that the terminus has been lit up in pink colour, it's looking beautiful also," said a local. pic.twitter.com/mUhXnL3igF
— ANI (@ANI) March 7, 2021
8 मार्च, 1917 रोजी रशियातील महिलांना मताधिकार मिळाला. त्या आधी अमेरिकेतील समाजवादी पक्षाचे पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1909 हा दिवस ‘महिला दिवस’ म्हणून साजरा केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेने 1910 सालापासून हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करावा अशी सूचना केली. वर उल्लेख केल्याप्रमाणे रशियन महिलांना ८ मार्चला मताधिकार मिळाल्यामुळे हा दिवस 8 मार्चला साजरा करण्यास सुरुवात झाली.