murder suspect dies| Representative Image (Photo Credit: Pixabay)

Palghar Shocker: पालघर (Palghar) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये एका महिलेचे कापलेले शिर सुटकेसमध्ये (Woman’s Severed Head Found Inside Suitcase) आढळले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुरुवारी संध्याकाळी विरार परिसरातील पिरकुंडा दर्ग्याजवळ हा प्रकार उघडण्यात आला. काही स्थानिक मुलांना एक सुटकेस सापडली आणि त्यांनी ती उत्सुकतेपोटी उघडली. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. गुरुवारी संध्याकाळी विरार परिसरातील पिरकुंडा दर्ग्याजवळ हा मृतदेह आढळला. मांडवी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळाला भेट देतील. हत्येचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख मर्डर केसमध्ये Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती)

पालघरमध्ये 6 वर्षांच्या मुलीची हत्या -

दरम्यान, पालघर जिल्ह्यात रविवारी एका 6 वर्षांच्या मुलीची मत्सरातून हत्या केल्याच्या आरोपाखाली एका किशोरवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या कृत्याची प्रेरणा एका सिरीयल किलरबद्दलच्या हिंदी चित्रपटातून घेतली होती. पेल्हार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीचा मृतदेह पहाटे 4.30 वाजता श्रीराम नगर टेकडीवर आढळला. (हेही वाचा - Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खंडणी प्रकरणी गुन्हा, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड)

पोलिसांनी नालासोपारा येथील एका 13 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मृत मुलगी त्याची चुलत बहिण होती. त्याने मत्सरातून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी मुलाला वाटत होते की, सर्वजण तिचे लाड करतात. त्यामुळे त्याने हे क्रूर कृत्य केले, असं पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकुटे यांनी सांगितले.