Woman's Dead Body In Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टॅंकर मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या चा तपास सुरू
Death PC PIXABAY

पुण्याच्या (Pune)  फुरसुंगी (Phursungi) भागात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास पाण्याच्या टॅंकर मध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळFoundबळ उडाली आहे. घरातून बेपत्त झालेली ही महिला फुरसुंगी जवळ एका पॉवर हाऊसला पाणी देताना टॅंकर मध्ये असल्याची बाब समोर आली. दरम्यान महिलेचा मृतदेह थेट पाण्याच्या टॅंकर मध्ये आढळल्याने अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. सध्या पोलिसांकडून ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरू आहे.

महिलेचं नाव कौशल्या मुकेश चव्हाण आहे. या महिलेचं वय 25 वर्ष असून JSPM College जवळ दुगड चाळीमध्ये ती राहत होती. कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये तिच्या बेपत्ता असण्याची तक्रार करण्यात आली आहे. पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे हे दुगड चाळीमधील वॉटर टॅंकरच्या व्यवसायात एका टॅंकरचे मालक आहेत. ते पुण्यामध्ये विविध भागात टॅंकर पोहचवतात. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांनी टॅंकर पार्क केला होता.

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरले. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळील घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी ते टँकर घेऊन गेले. टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर आले नाही म्हणून, त्यांनी प्रथम व्हॉल्व्ह तपासले. मात्र, पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून आतून एक साडी आल्याचे पाहिले. साडी कुठून आली हे पाहण्यासाठी ते टँकरमध्ये चढले. टँकरचे झाकण उघडले असता कौशल्याचा मृतदेह पाण्यात आढळला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विवाहबाह्य संबंधांचा संशय; पतीने इंस्टाग्राम वापरण्यास रोखल्याने गळफास घेत पत्नीची आत्महत्या .

टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला घरातून गायब का झाली याचे नेमके कारण शोधले जात असून ही हत्या की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येणार नसून शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.